तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज कंपनीच्या प्रदूषीत राखेच्या धुराने आज दुपार पासून गावकऱ्यांना श्वासघेण्यास त्रास होत आसल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे…

विनायक पवार

तारापूर एमआयडीसीमधील विराज स्टील आणि विराज प्रफाईल या कंपनीत लोखंडावर प्रक्रीया करताना निर्माण झालेली राख (फ्लाय एश) ही बोईसर पूर्वेकडील नागरी वस्ती असलेल्या बेटेगाव च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आली असून या राखेच्या डोंगराला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने त्यातून तयार होणार्‍या घातक धूराने सभोवतालच्या बेटेगाव,मान,वारांगडे गावातील नागरीकांना आज दुपार पासून श्वास घेण्याचा त्रास जानऊ लागला आहे.

तारापूर एमआयडीसीमध्ये विराज प्रोफाईल ही स्टील उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या तारापूर आणि वारांगडे येथील प्लांटमध्ये लोखंडावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषीत राख बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व्हे क्र.१५८/१/६४ मधील २५ एकर जागेमध्ये साठवणूक करण्यात येत असून या ठिकाणी राखेचे भलेमोठे डोंगर तयार झाले आहेत.

या प्रदूषीत राखेच्या ढीगार्‍यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून काल ( दि.२२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे परीसरात प्रचंड धूर निर्माण होऊन त्याचा सभोवतालच्या बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग,ओत्सवाल वंडरसिटी,रूपरजत पार्क या गृहनिर्माण सोसायटयासह नवापाडा,मान आणि वारांगडे येथील आदीवासी पाडयातील नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या बंबाने जवळपास ४ वाजाता ही आग आटोक्यात आणली.आदीवासी पाड्याजवळ करण्यात येणार्‍या या प्रदूषीत राखेच्या साठवणुकीसाठी कंपनीने संबंधित बेटेगाव ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला आहे.

या जागेच्या बाजूलाच स्थानिकांच्या शेतजमिनी असून पावसाळ्यात हे राखेचे प्रदूषीत पाणी ओढे-नाले यांच्यावाटे परीसरातील जमिनी, विहीरी-कूपनलिका यांच्यामध्ये झिरपून शेतजमिनीसोबतच पिण्याचे पाण्याचे स्त्रोत देखील दुषीत होत आहेत.

तसेच राख वार्‍यासोबत आकाशात उडून त्याचे थर पुन्हा परीसरातील घरांवर तसेच शेत पिकांवर येऊन बसत असल्याने अनेकांना श्वसनाचे तसेच अस्थमाचे आजार बळावत आहेत. विराज कंपनीकडून बेकायदेशीरपणे होत असलेल्या प्रदूषीत राखेच्या या साठवणुकीविरोधात बेटेगाव,

मान आणि वारांगडे येथील गावकर्‍यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.परंतु त्यांची प्रदूषीत राखेच्या फेर्‍यातून अजूनही सुटका झालेली असून विराज प्रोफाइल या कंपनी वरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केले आहे.