नवीन पेंन्शन योजना हटवण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे ठिय्या आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रीय पेन्शन योजना हटवून जुनी पेन्शन योजना राबवण्यात यावी. या मागणीसाठी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आज सांगली जिल्हा परिषदेसमोर सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान केंद्र शासनाप्रमाणे सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी तसेच प्रॉव्हिडंट फंड आचे लाभ राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केले पाहिजेत अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी चंद्रकांत ऐवळे, नामदेव कांबळे, दिलीप मासाळ, संदीप गुंजाळ, बळीराम कसबे, कुशाबा करे, आयुबखान सनदी, अमिन शेख ,वसंत सलगर, शंकर व्हनमाने, विजय सुतार, बाळासाहेब बारगीर, वैभव माने आणि सुनील जमदाडे आधी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here