खातेदारांचे पैसे द्यावे या साठी आमदार विजय रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन…

आमदार आंदोलन कर्त्यांना भेटलेच नाही…

गोंदिया – अमरदीप बडगे

गोंदिया जिल्ह्याच्या मुंडिकोटा येथे असलेल्या जागृती पत संस्थेत ठेवीदारांची ठेवीचा गैर व्यवहार करून लोकांच्या कोट्यवधी रुपये बुडविले आहे. या प्रकरणी खातेदारांनी तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल सुद्धा केला आहे. हे प्रकरण 2017 पासून सुरु आहे. संचालक मंडळानी खातेदारांचे 45 कोटी रुपये बुडविले खातेदार वारंवार आपल्या पैशाची मागणी करून सुद्धा गोर गरीब लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नाही आहे.

संचालक मंडळात तिरोडा विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय राहांगडाले यांचे भाउ राजेंद्र रहांगडाले या बँकेच्या संचालक मंडळ मध्ये असून सुद्धा लोकांचे पैसे देण्यात आले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांनी तुमचे पैसे मी मिळवून देईन असे आश्वासन दिले होते. मात्र आता तीन वर्ष होऊनही खातेदारांचे पैसे मिळाले नाही त्यामुळे आज खातेदारांनी आमदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केला आहे.

आमदारांच्या भावाला अटक करा व खातेदारांचे पैसे देण्यात यावे या साठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विशेष म्हणजे आमदार आंदोलनांना भेटण्यासाठी आपल्या जनसंपर्क कार्यालया बाहेर आलेच नाही ज्यामुळे आंदोलन कर्ते खातेदारांनी आमदार बद्दल नाराजगी व्यक्त केली.

या वेळी रविकांत ( गुड्डु ) बोपचे, जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, उपाध्यक्ष अशोक पेलागडे, सचिव रितेशकुमार गहेरवार, गायकवाड सर, तिवुडे सर, वैद्य अंडेवाला, बंसोड, शर्मा मॅडम व मोठ्या संख्येने ठेवीदार व खातेधारकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here