सोयाबीन बियाणे उत्पादन सोपे तंत्रज्ञान…

पुढच्या वर्षी करीता शेतकऱ्यानी आपल्या शेतातील बियाने राखुन ठेवावे – सचिन कांबळे

मंगरुळपीर – पवन राठी

शेलुबाजार येथुन जवळ असलेल्या भुर-पुर शिवारात कृषि विभागा मार्फत शेतकऱ्यांकरीता बियाण्यासंबंधी जनजागृति मोहिम चालु करण्यात आली आहे. सोयाबीन सरळ वाणअसल्यामुळे दरवर्षी बियाणे बॅग घ्यायची आवश्यकता नाही.

यावर्षी पेरलेल्या सोयाबीन मधूनच पुढच्या वर्षी बियाणे ठेवता येइल. साधारण १ हेक्टर करीता १ क्विंटल बियाणे ठेवावे. शेतातील प्लॉट निवडताना ३ मीटर विलगीकरण अंतर ठेवावे. पुढच्या वर्षी पेरणी क्षेत्राच्या हिशोबाने ५ ते १० गुंठे क्षेत्र बियाणे करिता निश्चित करावे.निवडलेल्या क्षेत्रातील जास्त उंचीची झाडे व मुख्य वानापेक्षा वेगळी दिसनारी झाडे उपटून टाकावीत.

निवडलेल्या क्षेत्रावर बुरशीनाशकांची tebukonizol१०℅+ सल्फर ६५% या संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी.सोयाबीन पीक दाण्यात पूर्ण परिपक्व झाल्यावर १७% पेक्षा कमी आर्द्रता असताना काढणी करावी.

मळणी करताना मळनी यंत्राचे फेरे ३५० ते ४०) ठेवावे त्यामुळे दाण्यास कमी इजा पोचेल शक्य असल्यास बियाणे ठेवावयाचे सोयबिनची मळणी मजुरांच्या सहाय्याने करावी मळणी केल्यानंतर सोयाबीन ताडपत्री वर सावलीमध्ये २ -३ दिवस बियाण्यामध्ये आर्द्रता १० ते १२ % होइपर्यंत चांगले वाळवून घ्यावे.

सोयाबीन बियाणे साठवण करताना ज्युट च्या पोत्यात (बारदाना) ५० ते ६० किलो प्रत्येकी एवढेच भरून घ्यावी बियाणे थप्पी ७ फुटापेक्षा उंच असू नये व जमिनीच्या वर लाकडी फळीवर ठेवावी. साठवणूकीनंतर व वाहतूक करताना आदळआपट होऊ देऊ नये.

पेरणी करतांना ७५ ते १०० मिलिलीटर पाऊस झाल्यावर रासायनिक बुरशीनाशकांची कार्बोकझिन ३५.५℅+थायरम ३५.५℅ ३ ग्राम प्रतिकिलो प्रमाणे व जिवाणू संवर्धन रायझोबियम, पी.एस.बी. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी अशी माहिती मंगरुळपीर तालुका कृषि अधिकारी, सचिन कांबळे यांनी दिली.

यावेळी मंडळ कृषि अधिकारी,रविन्द्र इंगोल, आकाश इंगोले, शिवाजी अंभोरे, यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृ.प्र. पी.आर.भगत, कृषि सहाय्यक विजयता सुर्वे, अविनाश ठोम्बरे, स्नेहा फुके, मंगेश कोल्हे, कृषि उत्तपन्न ब.स.उपबाजार शेलुबाजार सभापती राजेन्द्र राऊत, तसेच रामा राऊत, गोपाल देवळे, रमेश चौगुले, गजानन देवळे, संतोष धनोटे, श्रीकृष्ण भगत, अनिल झळके, ज्ञानदेव चौगुले, गणेश कुरवाळे, बबन कस्टे, हिम्मत अवगन या शेतकऱ्यांची उपस्तिथि होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here