निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन…
मुर्तिजापूर – शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत निर्माण होणारे प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर भारताची नवी ओळख बनेल त्यामुळे प्रत्येक भारतीयाने या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रवचनकार ह भ प तुकाराम महाराज सखारामपुरकर (मठाधीश इलोरा संस्थान) यांनी केले.
दिनांक १२ जानेवारीला श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण, गृह संपर्क व निधी समर्पण अभियान मुर्तिजापूर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.स्थानिक गाडगे महाराज विद्यालयासमोरील सद्गुरू काँम्पलेक्स येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी हभप छत्रपती तिडके महाराज तालुका संघचालक त्रिंबकराव जिरापुरे नगराध्यक्षा मोनाली गावंडे जिल्हा कार्यवाह प्रकाश शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी चौकापासुन ते कार्यक्रम स्थळापर्यत उद्घाटक तुकाराम महाराजांना भगवेध्वज धारी कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीने आणले जय श्रीराम , भारत माता कि जय अशा गगनभेदी घोषणांनी संपुर्ण परीसर दणाणून गेला होता. ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येतील कार सेवेत सहभागी होणारे कारसेवक राम किशोर श्रीवास , बाबूलाल गुप्ता , राजेंद्र गुल्हाने , वसंता केळकर ,
राजाभाऊ बढे यांचा याप्रसंगी तुकाराम महाराजांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तालुका संयोजक मंगेश अंबाडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहरासह तालुक्यातील १२१ गावांमधील प्रत्येक घरापर्यंत या अभियानाच्या माध्यमातून पोहोचण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी जिल्हा प्रचारक अंबादास साठे , ह भ प वहिले महाराज ,महाजन पांडेबुवा , दत्ता कपिले कमलाकर गावंडे, सचिन देशमुख, रीतेश सबाजकर, अशोक शर्मा, विनायक वारे, भारत भगत, रामा हजारे, अभय पांडे, राहुल गुल्हाने, शालीनी हजारे, तिवारी इ. उपस्थित होते.
तेरा फुट श्री राम मुर्ती ठरली आकर्षण कार्यालयाच्या दर्शनी भागासमोर ठेवलेली तेरा फुट उंचीची श्री राममूर्ती व हनुमान मुर्ती कार्यालयाचे आकर्षण ठरली असून खास अभियानानिमित्त स्थानिक कलावंतानी या मुर्ती बनवील्या आहेत .मुख्य रस्त्यावर असणाऱ्या कार्यालयावरील आकर्षक विद्युत रोषणाईने यामुर्तींचे सौंदर्य अधिक खुलले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.