राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक यांचे प्रतिपादन…
देवलापार – पुरुषोत्तम डडमल
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे.हे राम मंदिर जागतिक सांस्कृतिक,सामाजिक समरसतेचे उदाहरणच राहील.असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांनी प्रतिपादन केला.
हिवरा बाजार येथील बाजार चौकात राम जन्मभूमी गृहसंपर्क व निधी समर्पण अभियान ग्राम समिती हिवराबाजार च्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प.धनीराम लाडे महाराज, ह.भ.प नरहरी सलामे महाराज, ह.भ.प.बंडुजी राऊत महाराज, समाजसेविका विद्याताई जयस्वाल उपस्थित होते.
जवळजवळ पाचशे वर्षाच्या हिंदू समाजाच्या संघर्षानंतर आणि ४ लाखांपेक्षा जास्त कार सेवकांच्या बलिदानानंतर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या ही श्री रामाची जन्मभूमी आणि इथे प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे असा न्यायनिवाडा करून याकरिता केंद्र सरकारने तात्काळ न्यासाची स्थापना करावी असे निर्देश दिल्यानंतर व संपूर्ण 67 एकरची जागा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या स्वाधीन केल्यानंतर श्रीराम जन्मभूमी वर मंदिराचे कार्य प्रारंभ झाले.
हे मंदिर सरकारच्या पैशाने किंवा कोणत्याही ही उद्योगपतीच्या पैशाने उभारायचे नाही. तर या मंदिर उभारणीत संपूर्ण हिंदू समाजाचा खारीचा का होईना,पण वाटा असावा आणि हे मंदिर आपले आहे, असी आत्मीयता प्रत्येकाला वाटायला हवी. याकरिता या मंदिराच्या उभारणीत प्रत्येक राम भक्ताच्या सहभाग असावा.
कारण दिवसभर कळत नकळत आपल्या तोंडून रामाचे नामस्मरण होत असते. म्हणूनच श्रीराम राम जन्मभूमी समर्पण व गृह संपर्क अभियानात आपणा सर्वांचा सहभाग असावा असे आवाहन प्रसाद महानकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या पूर्वी संपूर्ण गावात रामरथ फिरवून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे गावातील सर्व वातावरण राम भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाचे संचलन भारत कुंभलकर यांनी, प्रास्ताविक विजयाताई सावरकर व आभार राम जन्मभूमि अभियानाचे रामटेक जिल्हाप्रमुख मंगलप्रसाद घुगे यांनी केले.
याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती महेश बमनोटे,ह.भ.प. रामकृष्ण टेटे,ह.भ.प. सतनारायण बमनोटे, राम जन्मभूमी अभियानाचे देवलापार तालुका प्रमुख वैभव गडकरी, कोष प्रमुख दिलीप नाईकवार, पुरुषोत्तम डडमल,मनोज चंदेल, रोशन गुरनुले आणी रामनारायण बोल्लु उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गणेश कुंभलकर,रामदास कुंभलकर, झाडूलाल सलामे,जितेंद्र जयस्वाल,विनोद बमनोटे,राजु बमनोटे,शैलेष सलमाके,जयपाल सलामे,पंकज नान्हे,प्रशांत गणोरकर, सुरेद्र दहिलिंगे,नितेश बमनोटे यांनी प्रयत्न केले.