माझे जीवन घडविणारे श्री शिवाजी महाविद्यालय…न्यायमूर्ती किशोरी रोही

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट येथे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा. किशोर रोही व न्यायमूर्ती अरविंद रोही यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी माजी न्यायमूर्ती मा.किशोर रोही व त्यांचे बंधू न्यायमूर्ती मा. अरविंद रोही यांचा शाल व मेमोन्टो देऊन यथोचित सत्कार केला. विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय करून प्राचार्यानी सांगितले कि, माननीय न्यायमूर्ती रोही हे आकोट येथील रहिवासी असून ते आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

यावेळी मा. किशोर रोही यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की, या महाविद्यालयाने आम्हाला घडविले. इथेच आम्ही ज्ञानाचे धडे घेतले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी अकोट येथे महाविद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. ज्ञानाची दारे सर्वांकरिता उघडी करून दिली.

आमचा त्यावेळचा काळ सरळ विद्यार्जनाचा व शिक्षणाने बहरलेला काळ होता. म्हणूनच पुढे आम्ही यशस्वी वाटचाल करून न्यायमूर्ती पदापर्यंत पोहोचु शकलो. विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाच्या शिक्षणाचा फायदा घेऊन उच्चशिक्षित व्हावे असा आशावाद त्यांनी प्रगट केला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती न्यायमूर्ती अरविंद रोही, उपप्राचार्य डॉ. संजय वाघ, कला शाखा प्रमुख डॉ. विलास तायडे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ रवी जुमळे हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गजानन तायडे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here