राजु कापसे
रामटेक
हा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यक्षेत्रातील प्रवास आणि उकृष्ट सामाजिक कार्य ह्याकरिता त्यांची निवड करण्यात आली असून,त्यांना हा पुरस्कार 21 मार्च ला मौलाना आझाद रिसर्च सेन्टर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
जनामदेव राठोड हे मागील बऱ्याच वर्षांपासून आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून आदिवासी बहुल रामटेक तालुक्यात महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण ह्यावर कार्य करतात.त्याचबरोबर आर्ट ऑफ लिविंग आनंद अनुभूती शिबीर ,नवचेतना शिबिर च्या माध्यमातून लोकांना तणावमुक्त जीवन जगता यावे.
आणि त्यांचे आरोग्य निरामय राहावे ह्या करीता सतत शिबिर घेत असतात.मागील एक वर्षांपासून विविध विषयांवर सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांनी जवळपास 2900 च्या वर कवितेचे लेखन केले आहे .एवढ्या अल्प कालावधीत एव्हड्या रचना लिहून त्यांनी साहित्यक म्हणून आपला नावलौकिक मिळविला आहे.