“श्रमजीवी” झाली महाराष्ट्रातील सर्वाधिक नोंदणीकृत सभासद असलेली संघटना…

सभासद नोंदणीत श्रमजीवीने पार केला एक लाखाचा टप्पा.

सेवा आणि अहिंसक संघर्ष हाच सामाजिक बदलाचा मार्ग – विवेक पंडित.

उसगाव/वसई – 37 वर्षांपूर्वी केवळ 37 सभासदांपासून सुरू झालेली श्रमजीवी संघटना आज 38व्या वर्षी आपल्या नोंदणीकृत 1 लाख सभासदांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झाली आहे. आज 2020 वर्षातल्या  संघटनेचे तब्बल 1 लाख 1 हजार 642 (10,1642) एवढ्या सभासदांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

या निमित्ताने आज उसगावला जल्लोषाचा कार्यक्रम पार पडला. संघटनेचे एक लाख सभासद होतील, हे कुटुंब एवढे विस्तृत होईल असे कधीही स्वप्नातही वाटले नव्हते,आजच्या दिवशी आयुष्यात यापेक्षा अधिक काहीही नको असे भावनिक उद्गार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

या लाखभर सभासदांच्या 4 लाख कुटुंबांचा संघटेनवर असलेला विश्वास आपल्याला सार्थक करावा लागेल, प्रत्येक गरिबाच्या झोपडीपर्यंत खऱ्या स्वातंत्र्याचा प्रकाश पोहचावा यासाठीचा लढा अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी हे लाख मोलाचे बळ आज मिळाले असल्याचे यावेळी पंडित यांनी सांगितले. सेवा आणि अहिंसक संघर्ष हाच सामाजिक बदलाचा मार्ग असल्याचेही ते म्हणाले.

37 सभासद घेऊन सुरू केलेल्या संघटनेच्या जन्माआधी विधायक संसद या आपल्या संस्थेमार्फत 24 वेठबिगार मुक्त केलेले, त्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांनी संघटनेचा पाया रचला, आपल्या जीवाची पर्वा न करता झिजले झटले त्यांच्यासह आता गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवून सभासद करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना हा आजचा विजय अर्पण आहे असे मत यावेळी संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी व्यक्त केले. 

विवेक आणि विद्युल्लता पंडित दोघेही अत्यंत भावनिक होऊन बोलत होते, संघटनेच्या वेठबिगारी मुक्तीच्या लढ्यात बंडाचा पहिला झेंडा फडकविणाऱ्या कै.मनोहर परेड या दहिसर येथील जुन्या सभासदाची आठवण करत कृतज्ञता व्यक्त केली.

संघटेनच्या व्यवस्थेत स्थापनेपासून नोंदणीकृत सभासद करण्याची पद्धत ट्रेड युनियनच्या नियमांच्या अधीन राहून पूर्वीपासून आहे, पहिल्या वर्षीपासून त्या त्या वेळी असलेल्या एक दिवसाच्या वेतनाप्रमाणे सभासद वर्गणी अकारून सभासद केले जायचे, पहिल्या वर्षी 2 रुपये जसे वेतन वाढले तशी वर्गणी वाढत गेली ती आता 100 रुपये प्रति सभासद आहे.

यावर्षी लॉकडाऊन काळात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होऊन कोणतेही सभासद पावती, जात पात, धर्म, प्रांत न विचारता अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत केली, घरोघरी धान्य दिले, भुकेल्याला घास दिला, रस्त्याने उन्हातान्हात चालणाऱ्या मजुराला घरी पोहचवले या कामाची पोचपावती सभासद नोंदणी मोहिमेत संघटनेला मिळाली.

मागील वर्षी संघटनेचे 74 हजार 43 (740043) इतके सभासद होते, यावर्षी या 9 व्या महिन्यातच एक लाखाचा टप्पा पार करून संघटनेने नवा इतिहास घडवला आहे.आज उसगाव येथे झालेल्या कार्यक्रमात विवेक पंडित, विद्युल्लता पंडित, आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा ,कार्याध्यक्ष केशव नानकर आणि इतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उसगाव डोंगरीत संघटनेच्या मुख्यालयात असकेल्या गावदेवी माता,

श्रमजीवी माता,यांचे पूजन करत नंतर पारंपरिक नाच गाणे करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सायंकाळी संघटनेचे जन्मगाव असलेल्या वसईतील दहिसर या गावी मिरवणुकीने विवेक आणि विद्युल्लता पंडित यांच्या स्वागत सन्मानाचा कार्यक्रम होणार आहे.

तर उद्या संघटनेच्या सर्व गावा गावांमध्ये दिवाळीसारखा उत्सव होणार आहे, संघटेनच्या या अभूतपूर्व यशाला जल्लोषाचे स्वरूप आले असून संघटना परिवारात सर्वत्र दिवाळीपूर्वीच दीपोत्सव साजरा होताना दिसत आहे.

यापूर्ण वाटचालीत सभासद कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम केले, यासोबतच जे आपल्यात आज त्यांचेही अमूल्य योगदान आहे, सोबत या प्रवासात अनेक हितचिंतक, दाते, पत्रकार, आणि इतर अनेक मित्रांनी साथ दिली अशा सर्वांचे यावेळी पंडित दाम्पत्याने भरभरून आभार मानले. संघटनेच्या भावी पिढीतील युवा कार्यकर्ती वैभवी दवडे हिच्याकडे विवेक आणि विद्युल्लता पंडित यांनी सभासद संख्या प्रमाणात सुपूर्द करून एक नवा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here