अमरावतीच्या ‘या’ भागात बरसल्या पावसाच्या जोरदार सरी…

अमरावती – हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर आज अमरावती शहरातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने गेल्या आठवड्यापासून तापत असलेल्या उकर्ड्या पासू काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यावेळी अमरावती शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

अमरावती शहरात रात्री 7,30 च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली, शहरातील दस्तुर नगर ते मंगलधाम भागातील काही नगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

विजेच्या कडकडाटमुळे शहरातील विद्युत पुरवठा काही काळ बंद झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here