“हात दाखवा रिक्षा थांबवा लस घ्या” फिरत्या रिक्षातून लसीकरण उपक्रमाचा शुभारंभ…

सांगली – ज्योती मोरे

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना लसीकरण व्हावे यासाठी आज सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सां.मि.कु.मनपा क्षेत्रात महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय संस्था यांच्यामार्फत पहिल्या डोसचे ५८ टक्के व दुसऱ्या डोसचे २५ टक्के इतके नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

म्हणूनच आज होणाऱ्या लसीकरण अभियानामध्ये जवळपास पन्नास हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक प्रभागनिहाय लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रभाग क्र. १८ मध्ये कार्यक्षम नगरसेवक मा.अभिजित भोसले यांच्या संकल्पनेतून प्रभागातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक घरात लसीकरण व्हावे या उद्देशाने “आम्ही आलो आपल्या दारी.

लसीकरणाची आरोग्य वारी” हे मोफत लसीकरण अभियान सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ मा जितेश भैया कदम यांच्या हस्ते पार पडला. १५ फिरत्या रिक्षांच्या माध्यमातून लसीकरण करणेचा हा स्तुत्य उपक्रम राबवत रिक्षा थांबवा आणि लस घ्या, सोबतच कॉल करा आम्ही घरी येऊ अशा उपक्रमांनी प्रभागांमध्ये नागरिकांचे लसीकरण पार पडणार आहे.

हे अभियान आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याबरोबर कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी नक्कीच ताकद देईल. त्यामध्ये एकूण 15 टीम सहभागी असून प्रत्येक टीम मध्ये लक्ष देणारी एक व्यक्ती, सोबत एक रजिस्ट्रेशन साठी लागणारी व्यक्ती, त्यासोबत एक आशा वर्कर भगिनी आणि त्यांच्यासाठी एक फिरते रिक्षा मधील लसीकरण केंद्र असे नियोजन करण्यात आलेले आहे.

सदर रिक्षा संपूर्ण प्रभागात सेट कानाकोपऱ्यात गल्लीबोळात फिरणार असून प्रत्येक ठिकाणी घराच्या समोर थांबून नागरिकांच्या कडे लसीकरणाबाबत चौकशी करण्यात येणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या सर्वच्या सर्व घटकांना समावेश करून त्यांना लसीकरण अंतर्गत आणून कोरोनाच्या महामारी चा सामना करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येईल.

संपूर्ण उपक्रम माननीय राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सुरू असून असे जास्त नागरिकांचे लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल.सदर उपक्रमाला काँग्रेस नेत्या जयश्री वहिनीसाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल दादा पाटील यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभत आहे. सदर उपक्रमासाठी माननीय राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांनी कौतुक केले आणि उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर उपक्रम आणि त्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यास उपक्रमाला पायलट प्रोजेक्ट म्हणून वरिष्ठ पातळीवर ती प्रमोट करणार असल्याबाबत सुद्धा त्यांनी सांगितले. यावेळेस प्रभागातील मेडिकल ऑफिसर डॉक्टर शितल धनवडे, रामा सोनुले, गणेश तेली संभाजी पोळ, शंकर अष्टेकर, बाबुराव मुसळे धनंजय जाधव बाबासाहेब गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

त्यावेळेस डॉक्टर जितेश कदम यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उद्घाटन पार पडले, सोबतच जितेश कदम यांच्या हस्ते संपूर्ण मेडिकल स्टाफ आणि या उपक्रमास उपस्थित असलेल्या प्रभागातील रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी त्यांचा आभारपर सत्कार केला. यावेळी बोलताना डॉक्टर जितेश कदम म्हणाले पद्धतीने जर संपूर्ण ठिकाणी काम झालं तर येणाऱ्या तिसऱ्या लाटे साठी संपूर्ण मनपा क्षेत्र, संपूर्ण राज्य देश समाज हा सामोरं जाण्यासाठी तत्पर असेल.

अभिजित भोसले यांचे काम नगरसेवक उल्लेखनीय असून पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याबाबत जितेश भैया कदम यांनी उल्लेख केला. पूर्ण उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, याच उपक्रमासाठी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांचे वतीने संपूर्ण मेडिकल स्टाफ, रिक्षा चालक-मालक संघटना, प्रभागातील नागरिक, या उपक्रमासाठी परिश्रम घेणारा संपूर्ण कार्यकर्त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here