जळगावात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार…

न्यूज डेस्क – जळगावात महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री 9 च्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलभूषण पाटील यांच्या घराजवळच हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यातून कुलभूषण पाटील बालबाल बचावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास हल्ला झाला आहे. पाटील आपल्या घराजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. कुलभूषण पाटील आपला जीव वाचवण्यासाठी घरात पळाले. त्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पाटील घरात गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक घराबाहेर आले असता हल्लेखोर पळून गेले.

या हल्ल्यानंतर कुलभूषण पाटील यांनी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज दुपारी शहरात क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी केली होती. पण, हा वाद काही मिटला नाही. शेवटी हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथे वाद मिटवण्यात आला. पण, या प्रकरणात एका गट संतप्त झाला होता. या गटाने मला पोलीस स्टेशनमध्येच शिवीगाळ केली होती. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. कुलभूषण पाटील यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहे. उपमहापौरावरच गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here