धक्कादायक | पूरूषाचा जागी दिला महिलेचा मृतदेह….अंतीम संस्काराचावेळी लक्षात आली चूक…नागपूरातील लता मंगेशकर रुग्णालयातील प्रकार…

नागपूर – शरद नागदेवे

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर रुग्णालयात कोरोनावरील उपचारा करिता ६२ वर्षीय पूरूष दाखल झाला होता.उपचार दरम्यान रविवारी त्याचा मुत्यू झाला. लता मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने याची माहिती महानगर पालिकेला दीली.मनपाचे कर्मचाऱ्यांची चमू आपले वाहन घेऊन रुग्णालयात दाखल झाली.

त्या आधी नातेवाईकांकडून मुतदेहाची ओळख पटविण्यात आली.यावेळी ६१ वर्षीय महिलेचा मुतदेह घेऊन जाण्याकरिता मनपाचे एक दुसरे वाहण तीथे उभे होते.मनपाचा कर्मचाऱ्यांनी वाहणात मुतदेह ठेवतांना चूक केली.

पुरूषाचा मुतदेहावर मोक्षधाम घाटावर व महिलेचा मुतदेहावर हिंगणा येथील घाटावर अंत्यसंस्कार होणार होते.परंतू मोक्षधाम घाटावर मुतदेह महिलेचा असल्याचे नातेवाईकांना लक्षात आल्याने मोठा अणर्थ टळला.

त्यामुळे आपला मानसाचे निधन झाल्यामुळे दु:खात असलेल्या नातेवाईकांना मनस्तापाला समोर जावे लागले. या प्रकरनात महानगर पालिकेला कर्मचाऱ्यांच्याची चुक आहे असे लता मंगेशकर रुग्णालयाचा प्रशासनाचे म्हणने आहे.रूग्णालयाची यात कुठलीही चूक नाही असे लता मंगेशकर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.काजल मीश्रा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here