धक्कादायक खुलासा… बेशुद्ध करून अशी झाली मनसुख हिरेन यांची हत्या…

न्यूज डेस्क :-  “मनसुख हिरेन” मृत्यू प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रं एनआयएकडे सोपवण्यात आले असून त्यातून मनसुख हिरेन यांना बेशुद्धावस्थेत कळवाच्या खाडीत फेकून देण्यात आले होते धक्कादायक खुलासा समोर

मनसुख यांना फोन करण्यासाठी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांने बनावट सिमकार्डचा वापर केला होता.अन त्याद्वारे मनसुख हिरेन यांना ठाण्यातील घोडबंदर रोड इथं फोन करून बोलावले होते. हे सिमकार्ड गुजरात येथून मागवण्यात आले होते. एकूण 14 सिमकार्ड होते, त्यापैकी एक सिमकार्ड विनायक शिंदेनं वापरलं..तावडे नावाच्या व्यक्तीला मनसुख यांना फोन करायला लावला होता. तावडे हे मुंबईत सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते

मनसुख हिरेन घोड्बंदरला पोहोचल्यानंतर त्याला गाडीत बेशुद्ध करण्यात आलं होतं. त्यांचं तोंड झाकण्यासाठी विनायक शिंदे याने रुमालाचा वापर केला होता.

त्यानंतर हिरेन यांना कळवा खाडीत टाकण्यात आले. खाडीत टाकण्यापूर्वी विनायक शिंदेनं सोन्याची अंगठी, साखळी आणि मनसुख हिरेन घातलेली महागडी घडी काढून घेतली होती.मिळालेल्या अहवालानुसार, जेव्हा त्यांना खाडीत ढकलण्यात आले होते, तेव्हा ते जिवंत होते. .

हा सर्व प्रकार एपीआय सचिन वाझे यांच्या आदेशानुसार करण्यात आला असावा असा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण कट सोबू हॉटेलमध्ये रचला गेल्याची माहिती आहे या प्रकरणात शिंदेनं आणखी बऱ्याच लोकांची मदत घेतली असावी असा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन यांचा जिलेटिन ठेवलेल्या कार प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास आता एनआयएची टीम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here