धक्कादायक | भंडाऱ्यात दोन तासात बदलला कोरोनाचा रिपोर्ट…शासनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर आयएमए चा रिपोर्ट निगेटिव्ह…रुग्णाने व्यक्त केली शंका

भंडारा : शहरातील एका २७ वर्षीय तरुणाने भंडारा येथील शासनाच्या कोरोना चाचणी केंद्रावर तपासणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्याला कोरोनाबाबतचे कुठलेही लक्षण किंवा त्रास नसल्याने त्याला या रिपोर्टवर शंका निर्माण झाली. त्यामुळे तरुणाने भंडारा शहरातील आयएमए हॉल येथे कोरोनाची पुन्हा एक चाचणी केली. त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.

विशेष म्हणजे या दोन्ही चाचण्या सदर तरुणाने आज (गुरुवारला) दोन तासांच्या अंतराने केल्या. अगदी दोन तासात दोन चाचण्यांचा अहवाल वेगवेगळा आल्याने कोरोना चाचणीवर शंका उपस्थित होत आहे.

भंडारा शहरातील एका वॉर्डातील या तरुणाच्या वडीलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील लहान तीन मुलांसह एकूण आठ सदस्यांची आज गुरुवारला कोरोना चाचणी केली. यात २७ वर्षीय तरुणाला कोरोना असल्याचा चाचणीत अहवाल आला.

तर, कुटुंबातील उर्वरित सर्व सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, सदर तरुण प्रकृतीने सुदृढ आणि कोरोनाचा कुठलाही त्रास किंवा लक्षण नसल्याने शासकीय कोरोना चाचणी अहवालावर त्याला शंका निर्माण झाली. त्यामुळे सदर तरुणाने भंडारा शहरात असलेल्या आयएमए हॉल येथील कोरोना चाचणी केंद्रावर जाऊन कोरोनाची तपासणी केली.

आयएमए हॉलमध्ये केलेल्या तरुणाच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. अगदी दोन तासांच्या अंतराने सदर तरुणाने या दोन्ही चाचण्या केल्या. शासकीय अहवाल पॉझिटिव्ह तर आयएमए चा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोना चाचणी अहवालावर आता शंका उपस्थित होत आहे. या दोन्ही अहवालामुळे तरुणासह त्याच्या कुटुंबीयांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यातही लाखनी तालुक्यातील एका गावातील उच्च शिक्षित कुटुंबातील एका सदस्याचा अहवाल अशाच प्रकारे आला होता. त्या कुटुंबातील सदस्यांनीही प्रशासकीय प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

आज भंडारा शहरातील तरुणाचा अहवाल शंका उपस्थित करणारा आला. आयएमए च्या केंद्राला शासन मान्यता आहे. तर, दुसरे केंद्र खुद्द शासनाचे आहे. त्यामुळे आता कुणाच्या अहवालावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
प्रतिक्रिया
स्वाब व्यवस्थित घावे लागते. ते व्यवस्थित घेतले नाही तर असे होऊ शकते. स्वाब घेताना एखाद्यावेळी टेक्निकल मिस्टेक होऊ शकते.

  • डॉ प्रमोद खंडाते
    जिल्हा शल्य चिकित्सक,
    जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here