धक्कादायक!…मेळघाटात कोरोना रुग्णाचा उपचार चक्क मांत्रिकाकडे…

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसर अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो…त्यांतही या अंधश्रद्धेला जास्त महत्व आहे…अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे..

मेळघाटातील सीमांडोह आरोग्य केंद्रात ४५ वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानतर चक्क नातेवाईकांनी तिचा मंत्रिकाकडे उपचार केल्याचा प्रकार समोर आलंय. यात महिलेचा दुर्दवी मृत्यू झाला आहे..

गुरुवारी रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील आजही मेळघाटात अंधश्रद्धा बाळगली जाते हे पुन्हा एकदा स्पस्ट झालं आहे,

बाईट:-दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी
प्रज्योत पहाडे, मेळघाट अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here