धक्कादायक | महिलेला विवस्त्र करून बळी देण्याचा प्रयत्न…बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील घटना…

फोटो- सांकेतिक

न्यूज डेस्क – महिलेला सैतानाचा अवतार असल्याचे समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करत अघोरी कृत्य करत तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे घडली आहे. या प्रकरणी मांत्रिकासह पाच जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

महेंद्र माणिकराव गायकवाड राजेंद्र माणिकराव गायकवाड कौशल्‍या माणिकराव गायकवाड नीता अनिल जाधव आणि तात्या नावाचा मंत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

करंजेपुल ला राहणाऱ्या महिलेने याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मात्र हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस हद्दीत घडला असल्याने वडगांव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.. महिलेला लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी हुंडा दिला नाही म्हणून तिचा छळ करीत होते.

त्यानंतर दोन्ही दिराने आणि सासूने भूत बाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलवले त्याने सांगितल्यानुसार आरोपीकडून लिंबू उतरवणे अंग धुपारे टाकणे भस्म लावणे अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावून घेतले हळदी-कुंकवाचे रिंगण तयार करून त्यात महिलेला बसवून नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले..

सासूने तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला दाबून ठेवले हा प्रकार पती आणि मुलाला सांगितले तर तुला ठार मारू अशी धमकी देखील दिली.. महिलेच्या रडण्याच्या आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिची सुटका केली या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.. वडगांव पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत..

सोमनाथ लांडे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक वडगांव पोलीस ठाणे )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here