धक्कादायक!…औरंगाबादेत सलग दोन दिवस मनपा कर्मचाऱ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न…

ऋषिकेश सोनवणे
औरंगाबाद

औरंगाबादः शहराच्या बाहेरून येणाऱ्यांची शहराच्या प्रवेश द्वारावर कोरोना चाचणी केली जाते. शहरातील प्रत्येक चेक पॉईंटवर कोरोना तपासणी पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र रविवारी कोरोना तपासणी करण्याच्या सूचना करण्यासाठी बसमध्ये चढलेल्या कर्मचाऱ्याचे चक्क अपहरण करू मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना झाल्टा चौक या ठिकाणी घडली. त्यानंतर लगेचच सोमवारी नगर नाका येथे देखील पालिका कर्मचाऱ्यांचे अपहरण करून थेट मध्यवर्ती बसस्थानकात आणून सोडल्याची घटना घडली.

मात्र या घटनेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ट्रॅव्हल्स मधील चालकाने मनपा कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल ९ तास लावले, यामुळे पोलिसांवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला. हैदराबाद-अरुणाचल प्रदेश ही बस रविवारी सकाळी ११ वाजता झाल्टा फाटा येथील तपासणी नाक्यावर आली. नेहमीप्रमाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस बसमध्ये चढले. मात्र चालकाने गाडी बाजूला घेण्याचे निमित्त सांगितले व सर्व कर्मचाऱ्यांना खाली उतरवले.

दरम्यान केंद्रप्रमुख कैलास जाधव हे बसमध्येच होते. चालकाने बस न थांबवता वेगाने पुढे नेली.बसचालक व इतरांनी जाधव यांना बेदम मारहाण केली. सोमवारी नगर नाका नाचणी परिसरात ठेवलेल्या खुर्च्यांवर एसटी महामंडळाचा शिवशाही बस चालकाने बस घालून या खुर्च्या तोडल्या. तसेच चाचणीचे आवाहन करण्यासाठी बसमध्ये शिरलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून थेट बस स्थानकात त्याला आणून सोडले. गोलवाडी फाटा येथील कर्मचारी अमोल खांडेकर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ शेळके यांनी बस थांबवली होती. खांडेकर व शेळके आवाहनासाठी बसमध्ये चढताच वाहनचालकाने विरोध केला व दार बंद करून बस थेट मध्यवर्ती बसस्थानकात नेली. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून काम करायचे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here