धक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…

मूर्तिजापूर | आंबेडकरी चळवळीचे नेते तसेच समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे यांची मुलगी ऍड.कु.शताब्दी खैरे, LLM (Gold Medalist), वय २९ वर्ष हिचे अकोल्यात उपचार सुरु असताना काल रात्री १ वाजता दुखःद निधन झाले. ही शरीराला थरकाप उडवून देणारी घटना आहे. सर्वसामान्य विश्वसनीय एक कार्यकर्ता सर्वांना सोडून निघून गेल्याने सर्वाना धक्काच बसला आहे. मागील आठवड्यात तिच्या आईचे कोरोनानेच निधन झाले होते.

ऍड.कु शताब्दी खैरे, नागपूर येथील उच्च न्यायालयात वकील म्हणून मागील ४ वर्षापासून कार्यरत होते. सर्वसामान्य लोकांसाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत धडपड करीत होती. तिने आपल्या समाजासाठी “Buddhist Law” असा एक कायदाच पुस्तक लिहिलं. आपल्या समाजासाठी अंमल करण्यासाठी केंद्र सरकारकडे निवेदन दिलं.

आदिवासीच्या शेतजमीन त्यांच्या नावावर करून देण्यास त्या यशस्वी झाल्या. सामाजिक न्याय हक्कासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विरुद्ध कायदेशीर नोटिसा पाठवून सर्वसामान्यांचे अधिकार व हक्क कायम ठेवण्यास यशस्वी ठरली.

आंबेडकरी चळवळी मध्ये, ऍड. प्रा. मुकुंद खैरे, (समाज क्रांती आघाडी) याचे सोबत त्यांचे खांद्याला खांदा लावून, तिच्या वयाच्या १०-१२ वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात, जसे, दिल्ली, नागपूर, मुंबई, अकोला व इतर राज्य जसे गाझियाबाद, हैद्राबाद, येथे तिने सहभाग घेतला. आपल्यातून निघुन गेल्यामुळे सर्व आंबेडकरी समाजावर, तरुण पिढीवर एक दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व आंबेडकरी समाज एक शोक व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here