शिवराज राँयलस ठरला मत्तिवडे जीपीएल चा मानकरी…

शिवराज रॉयल ठरला मत्तिवडे जीपीएल चा मानकरी…

राहुल मेस्त्री…

चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील क्रिकेटपटुचे मनोबल वाढविण्यासाठी व त्या खेळामधील हुनर दाखवण्यासाठी चिकोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि कर्नाटक राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जोल्ले उद्योग समूहाचे प्रमुख युवानेते

बसवप्रसाद जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली बसवज्योती युथ फौंडेशनच्या माध्यमातून या दोन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावामध्ये जीपीएल अर्थात जोल्ले प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे .त्याप्रमाणे आप्पाचीवाडी ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये येणाऱ्या मत्तिवडे तालुका निपाणी जीपीएल स्पर्धेचे

आयोजन केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना दिनांक 24 रोजी रात्री आठ वाजता ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असुन विजेता,उपविजेता आणि तिसऱा क्रमांक आलेल्या संघाना बक्षीस वितरण ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक आनंदराव

यादव यांनी केले..तर या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये तीन संघांना पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या संघांना रोख रकमेची बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आली. या स्पर्धेत अंतिम सामना आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य संघमालक राजू डोंगळे यांचा शिवराज रॉयल संघ आणि

हदनाळ येथील संघमालक धनाजी पाडेकर यांचा सरपंच शिलेदार या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला होता. सुरुवातीला नाणेफेक जिंकून सरपंच शिलेदार संघाने फलंदाजी करताना पाच षटकार तीन बाद 23 धावा करून शिवराज रॉयल संघासमोर 24 धावाचे आव्हान ठेवले.हे आव्हान पूर्ण करताना शिवराज रॉयल्स संघाने

अतिशय दिमाखदार पद्धतीने फलंदाजी करत 4.4 षटकात 24 धावांचे आव्हान पूर्ण करून आठ गडी राखून विजय मिळवला. आणि स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. तर तिसरा क्रमांक संघमालक शिवाजी बेनाडे यांचा संघ श्री ओम स्पोर्ट्स यांचा आला. यावेळी शंभुराजे चौगुले, गौतम पवार, जयसिंग मोरे, रोहित खोत, अनिल

पाटील ,संदीप देशपांडे, शिवगोंडा पाटील ,संजय देशपांडे यांच्यासह येथील भाजपा कार्यकर्ते व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेल्या संघाला 25000 व शिल्ड, द्वितीय क्रमांक आलेल्या संघाला 15000 व शिल्ड आणि तृतीय क्रमांक आलेल्या संघाला ट्राँफि अशा पद्धतीचे बक्षीस वितरण केले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here