बांधकाम साहित्य असून काम पूर्ण होत नसेल तर शिवसेना तर्फे ठिय्या आंदोलन इशारा…

दानापुर – गोपाल विरघट

तेल्हारा तालुक्यातील दानापुर गावामधील बस स्टँडवरील आणि वार्ड क्र.4 मध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेटरोडचे बांधकाम दोन वर्षा पुर्वी मा.आमदार यांच्या विकास निधी अंतर्गत मंजूर झाले होते.या मंजुर झालेल्या कामाचे बांधकाम खडीकरण अर्धवट झालेले आहे राहीलेले काम रखडलेआहे बसस्टॉप वरील खडीकरणातील तउघडे पडलले दगड वाहनांच्या चाकांखाली येऊन ऊडत आहेत.

त्या दगडां मुळे गावातील पादचाऱ्यांना तसेच बसस्टॉप वर ऊभे असलेल्या वाहनां लागून वित्त हानि होत आहे सामान्य नागरिक किवा प्रवासी यांच्या जीवितास हानी होन्याची शक्यता नाकारता येत नाही.या सिमेंट रस्त्यांचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लागावे ह्या संदर्भात १० जून रोजी शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन तात्काळ काही दिवसातच बांधकाम साहित्य आणून टाकण्यात आले आहे.

रविवार दि २० जून पासून सिमेंटरस्ता बांधकाम कामास सुरुवात करू असे संबंधितांकडुन सांगण्यात आले होते.परंतू बातमी लिहेस्तोवर बांधकामास सूरवात झाली नव्हती उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागा कडून रस्ता व बस स्टँड काँक्रीट कामाचा मुहूर्त निघेना.यामध्ये कोणत्या राजकीय पक्षाच्या दबावात तर बांधकाम थांबंवण्यात आले नाही ना ? अशा चर्चेला उधाण आले आहे.तरी कुठलेच कारण नसताना बांधकाम का बंद पाडले हे अद्याप समजु शकले नाही.

हेतू परस्पर थांबण्यात आले,का ?याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व रखडलेले काम पूर्ववत सुरू करून बांधकाम पूर्ण करावे.
सदरचे काम दिनांक २५ जून रोजी पर्यंत सुरू न झाल्यास शिवसेना तालुका उपाध्यक्ष गोपाल विखे शिवसेने च्या वतिने प्रस्थापित जागेवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

कामाची तक्रार वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाली असल्याचे कळले.तरी त्या तक्रारीची शाहनीशा करुन काम त्वरित सुरु करण्यात येईल,
श्री.एस.एन.बोचे
उपविभागीय अभियंता. तेल्हार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here