नागपूर येथील अजनी वन वाचवण्यासाठी शिवसेना पदाधिकारी प्रा.शिल्पा बोडखे यांच्या तर्फे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले…

नागपूर – राष्ट्रीय प्राथमिक महामार्ग प्राधिकरणातर्फे अजनी कॉलनी परिसरामध्ये प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन साठी येथील सात हजाराच्या वर झाडे कापली जाणार आहेत ही पर्यावरणाची मोठी हानी आहे.

ती थांबविण्याकरिता आज रस्त्यावर विविध संघटना उतरल्या आहेत उद्याच्या पिढीचा हा वारसा जतन व्हावा आणि त्यांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून त्याचा ठेवा राखण्यासाठी अजनी परिसरातील तसे संपूर्ण नागपूरातील लोकांच्या भावना जपण्यासाठी प्रा. शिल्पा बोडखे यांनी विविध संघटनेकडून व जागृत नागरिकांच्या वतीने आदित्य ठाकरे जी यांना अजनी वन वाचविण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

अजनी माॅडल स्टेशन प्रकल्पात रेल्वे मेन्स शाळा,शंभर वर्षे जुन्या इमारती, सर्वात महत्वाचे तेथील पशू-पक्षी ,वृक्ष ही नैसर्गिक संपत्ती म्हणजेच पूढील पिढीचा वारसा जतन करण्यासाठी संपूर्ण नागपूरातील जनता, विविध संघटना एकवटल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here