इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने विटा येथे सायकल रँलीचे आयोजन…

सांगली – ज्योती मोरे

आज विटा येथे इंधन दरवाढीच्या आणि महागाईच्या विरोधामध्ये शिवसेना आणि युवा सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते आणि युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड मिलिंद कदम यांच्या नेतृत्वाखाली या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केंद्र सरकारवर आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली हेच का ते अच्छे दिन अच्छे दिनाचा स्वप्न दाखवून गेल्या सात वर्षाच्या काळामध्ये शेतकरी व्यापारी छोटा-मोठा उद्योग धंदेवाला आणि सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने केंद्रामध्ये केले आहे.

अदानी अंबानीच्या घशात घालणारे कायदे निर्माण करून सातत्याने पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडण्याचा काम मोदी सरकारने केलेला आहे साठ रुपये चे डिझेल आज एकशे पाच रुपये च्या घरामध्ये गेलेला आहे गेल्या सात वर्षांमध्ये दाम दुप्पट करण्याचे काम मोदी सरकारने केलेला आहे सर्वसामान्यांच्या बँक अकाउंट मध्ये भारताबाहेर चा काळा पैसा आणून त्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचे स्वप्न अच्छा दिनाचा शब्द मोदी सरकारला दाखवलं होतं,

त्याचं फलीत म्हणून भारतातील सर्वसामान्य लोकांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोदी सरकारवर विश्वास दाखवून सलग दोन वेळ केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता दिले आणि मोदींनी शेडजी ना मोठे करण्याची भूमिका घेऊन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचा चे काम डिझेल पेट्रोल व गॅस दरवाढ करून केलेला आहे तसेच गॅस वर मिळणारी सबसिडी ही सुद्धा हळूहळू बंद करण्याचे महापाप मोदी सरकारने केले आहे.

याच्यामुळे सर्व वस्तूंचे भाव वाढले किराणा मालाचे भाव वाढले शेतीमालास पूरक व्यवसायाचे भाव वाढले ट्रॅक्टरांचे नांगरणीचे कोळपणी चे दर वाढले सिमेंट स्टील पत्रा मजुरीचे दर या सर्व गोष्टी वाढल्या त्यामुळे सर्वसामान्य लोकांना घर बांधणे मुश्किल झाले सर्वसामान्य लोकांना किराणा मालाचे बाजार घरामध्ये भरण्याचे सुद्धा आता परवडेनासे झाले आहे त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर लोकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.

त्याचा निषेध करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरून सर्देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड मिलींद कदम यांनी या निषेध मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी बोलताना युवा सेना जिल्हाप्रमुख यांनी झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करा या शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आणि येणाऱ्या काळामध्ये डिझेल पेट्रोलचे दर कमी न झाल्यास युवासेना अधिकतेने हे आंदोलन तीव्र करेल सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील करून ठेवलेले आहे.

या मोदी सरकारने अशा पद्धतीच्या तीव्र भावना यावेळी बोलताना व्यक्त केली . यावेळी उपस्थीत युवा उपजिल्हाप्रमुख रोहन जाधव तालुका प्रमूख प्रशांत भगत उपतालुखा प्रमुख धनंजय मंडले चिटणीस सोमनाथ फडतरे उपशहर प्रमुख प्रसाद लिपारे चिटणीस अली मुल्ला, वसुंबेचे मा सरपंच विकास पवार , बापूराव साळुंखे.अतुल भिसे,प्रदिप कदम ,संदीप जाधव, प्रतिक पवार ,आशीष सावंत ,ओंम चव्हाण यांचेसह अनेक शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here