शेतकर्‍यांना सरसकट अनुदान द्यावे – शिवसेनेची मागणी…

अहमदपूर व चाकूर – बालाजी तोरणे

अहमदपूर चाकूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन पाण्यामध्ये वापुन निघालेली आहेत खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यासाठी माननीय नामदार दादाजी भुसे साहेब कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की अहमदपुर चाकूर मतदारसंघातील सतत पडत असलेल्या पावसामुळे चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी 80 टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे परंतु सोयाबीन पिकांची दुबारा व काही शेतकऱ्यांनी ती बाराही पेरणी केली आहे बरेच सोयाबीनचे बियाणे उगवली नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून अनुदान देण्यात यावे व तसेच अहमदपुर मतदारसंघात मूग उडीद तीळ पीक काढणीच्या वेळी पाऊस पडल्यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे.या पिकांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी.

अहमदपुर मतदारसंघात 80 टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाखाली येते शेतकऱ्यांनी सोयाबीन सोयाबीन काढणी अवस्थेत आहे पण अवकाळी पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उभ्या पिकालाच शेंगा उगवत आहेत आणि पावसामुळे शेतामध्ये पिक काढत असताना गुडघ्याइतके पाय चिखलात जात आहेत त्यामुळे सोयाबीन काढणे शक्य होत नाही.

सोयाबीन संपूर्ण वापले आहे पिके वापल्या मुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेलेले आहेत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी सरसकट 25000 अनुदान देण्याचे नियोजन करावे नाहीतर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही.

सरसकट अनुदान दिले तरच शेतकरी आपली उपजीविका कसाबसा भागऊ शकेल अन्यथा शेतकरी ससेहोलपट परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे साहेबांना नम्र विनंती की पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे वाट न पाहता सरसकट मदत जाहीर करावी.

शेतकरी व शेतमजूर यांच्या हाताला काम मिळावे म्हणून मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त योजना राबविण्यासाठी राबविण्यासाठी प्रशासनाला सूचना द्याव्यात तसेच ठिबक व तुषार सिंचनाचे 2019- 20 वर्षाच्या अनुदान शेतकऱ्यांना लवकर द्यावे यासाठी अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना द्याव्यात व तसेच पीक विमा कंपन्यांना सूचना देऊन पिक विमा मंजूर करून देण्यात यावा.

असे निवेदन माननीय नामदार दादाजी भुसे साहेब कृषी व माजी सैनिक कल्यान मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना लातुर शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेव चाळक शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित ( बालीजी ) रेड्डी लातूर शिवसेना तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर तसेच सुभाष गुंडीले चंद्रकांत पारसेवार आसे आनेक शिवसैनिक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here