शिवसेना नगरसेविका ज्योती हारूण खान यांच्यातर्फे हजारो कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप…

धीरज घोलप

सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गेल्या पंधरा वर्षाची परंपरा जपत वार्ड न.124 शिवसेना नगरसेविका ज्योती हारुन खान आणि शिवसेना नेते हारुन खान यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्यांची दिवाळी आनंददायी होण्यासाठी यंदाही “आपुलकीची दिवाळी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळी आनंदात साजरा करत असतात. पण आपल्या विभागातील सर्वसामान्य ची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे. म्हणून दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करून “आपुलकीची दिवाळी” हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचसोबत भाऊबीजेची भेट म्हणून आपल्या लाडक्या वहिनींना साड्यांचे ही वाटप करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here