कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८३ दिवसापासून शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे घराबाहेरच…

पातूर (निशांत गवई ). कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शिरला ग्राम विकास अधिकारी राहुल बोंद्रे घराबाहेर पडले ते अद्यापही सुमारे 83 दिवसापासून स्वतःची दोन चिमुकली मुलं पत्नी आणि आई यांच्यापासून अद्याप दूर आहेत. मात्र शिरला ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र लढा देत आहेत.


कोरोना विरोधी लढ्यात अहोरात्र काम करत असत त्यांना आपल्या परिवाराला पुरणाची लागण होऊ नये यासाठी स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवण्याचा कठोर निर्णय ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे यांनी घेतला तो अद्यापही कायम आहे


23 मार्च 2020 रोजी लॉक डाउन झाल्यानंतर संपूर्ण देशात कोरोना विषाणूची प्रचंड दहशत असताना दुसऱ्याच आठवड्यात पातुर शिरला हद्दीत आठ जणांना कोरोणाची बाधा झाली होती. त्यामुळे शिरला पातुर शहराला तोरणा पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले महाराष्ट्रातल्या एकमेव कोरूना पथकाची स्थापना येथे करण्यात आली त्यासाठी कोणतेही बजेट नसल्यामुळे पंचायत समितीचे सदस्य अजय ढोणे यांनी आपल्या स्वतःची गाडी मोफत दिली आणि पातूर पोलिसांनी एक होमगार्ड दिला आणि ग्रामपंचायतीचे तीन कर्मचारी सोबत घेऊन दिवसापासून ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे यांचे पथक अहोरात्र कार्यरत आहे. आजही कोरोणा पथकाची गाडी घराबाहेर पडणाऱ्या आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांमध्ये धडकी भरवते.


अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक स्थलांतरित केले चारशे कुटुंब देशाच्या विविध कानाकोपऱ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेले होते लॉक डाउन होताच हे सर्वजण शिर्ला गावाकडे परतत होते अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक होता . त्यामुळे त्यांची वेळीच आरोग्य तपासणी करून घेण्यात आली
सात हजार घराच्या परिसरामध्ये हायड्रोक्लोराइड ची फवारणी करण्यात आली. सैनिटायझर आणि मास्क यांचे वितरण करण्यात आले .

गावात परतलेल्या चारशे कुटुंबांना क्वारंटीन करण्यात आलं . पेटीतील दुकानदार दुकाने बंद करीत नव्हते त्याबरोबरच आठवडी बाजारातील व्यापारी काही केल्या थांबत नव्हते त्यामुळे कठोर पावले उचलत या सर्वांवर राहुल उंदरे यांनी दंडात्मक कारवाई केली. मास्क न बांधणाऱ्या शेकडो नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
covid-19 वाढता धोका लक्षात घेता शिरला उपयोग परिचारिका केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यलयी राहण्याचे आदेश देण्यात आले आशा स्वयंसेविका यांना पि पि इ किट हैंडग्लोज,सैनिटायझरचे वितरण करणारी पहीली ग्रामपंचायत होती.


लग्नाचा मोसम असल्यामुळे शिरला ग्रामपंचायत मध्ये नवरी नवरदेव आणि त्यांच्या सोबतचे चार जण यांना covid-19 ची शपथ घेऊन आदर्श विवाह पद्धती निर्माण केली सध्या त्याच पद्धतीने लातूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीने विवाह केले जातात.


गावाबाहेरून येणाऱ्यांसाठी गावात प्रवेश करण्यापूर्वी चेक पोस्ट उभारली करुणा पासून बचाव करण्यासाठी वाहनांवर भोंगा लाऊन नागरिकांना आवाहन केले.
डॉक्टरांना मेडीकल दवाखाने चालू ठेवा त्याबरोबरच किराणा भाजीपाला देतानी घेताना यांनी सामाजिक अंतर पाडवा त्याबरोबरच घरगुती गॅस घरपोच देण्याची नोटीस गॅस एजन्सी मालकाला बजावली त्याबरोबरच उपाशी असलेल्या नागरिकांना दानदात्यांना आवाहन करून गोरगरिबांना घरपोच धान्याच्या किट दिल्या. ग्रामपंचायत हद्दीतील नाल्या साफ केल्या आणि आत्ता शाळा सुरू होत असल्यामुळे शाळांची निर्जंतुक काही करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे


अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी राहून उंदरे आपल्या कार्यक्षेत्रात नागरिकांना कोरोणा होऊ नये यासाठी सुमारे 83 दिवस घराबाहेर राहणारा अधिकारी कदाचित एकमेव असावा या महायोद्धाच्या कार्याची दखल उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनीसुद्धा घेऊन त्यांना बळ दिले आहे.त्याबरोबरच आमदार अमोल मिटकरी आणि शेतकरी शेतकरी नेते कृष्णा अंधारे तथा सुवर्णा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे अध्यक्ष सचिन कोकाटे यांनी प्रोत्साहन दिले.सध्या राहुल उंदरे नागरीकांच्या गळ्यातील ताईत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here