डहाणू – जितेंद्र पाटील
डहाणू तालुक्यातील कासा गावात अनेक दिवसापासून माकड शिरलं होते. आज दुपारच्या सुमारास माकड पोलीस कॉलनी मध्ये शिरले व धुमाकूळ घातला. लहान मुलांना चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होवून लोकांची पळापळ झाली.
लगेचच त्यांनी वनविभागाला कळवून वनपाल शिनवार यांना माकड आल्याची सांगितले. वनपाल शिनवार यांनी लगेचच त्या ठिकाणी जाऊन ‘वाइल्ड कॉन्सर्व्हशन अँड ऍनिमल वेलफेयर असोसिएशन’ यांना माहिती देऊन तात्काळ घटना स्थळी बोलावून घेतले.

माकड झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसल्याने त्याला फळाच अमिश दाखवून खाली उतरविले. वाइल्ड लाईफ टीम चे सदस्य अमित मोरे, धृमील बालिया, अंकित केणी यांनी मोठ्या शर्तीने माकडाला पकडून पिंजऱ्यात अडकवून त्याला मेंढवण च्या जंगलात सुरक्षित जागेवर सोडण्यात आले. ग्रामस्थांनी संपूर्ण टीम चे आभार मानले.