शिल्पा शेट्टी यांनी २९ रिपोर्टर्स आणि मीडिया हाऊसवर दाखल केला मानहानीचा खटला…

न्यूज डेस्क – अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात 29 रिपोर्टर्स आणि मीडिया विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. तिचा पती राज कुंद्रा आणि अश्लील चित्रपटाच्या प्रकरणात ‘तिची खोटी बातमी दाखविणे आणि तिची प्रतिमा खराब करणं’ यासाठी हा खटला दाखल केला आहे.

19 जुलै रोजी कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. पोलिस कोठडीनंतर आता शिल्पा शेट्टी यांचे पती राज यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी राज कुन्द्राला 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेत ही याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दाखल केलेल्या या याचिकेसोबतच अनेक उदाहरणेही सादर केली आहेत. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात सुरू असलेल्या तपासावर तिने प्रतिक्रिया दिल्याची आणि या प्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आल्याची अनेक उदाहरणं तिने सादर केली आहेत.

अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी आणि २५ कोटी रूपयांची मानहानीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

अश्लील चित्रपट प्रकरणापासून दूर असल्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवर कोणतीही खात्री न करता दिशाभूल करणाऱ्या वार्तांकनामुळे प्रतिमेचं नुकसान झाल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने या याचिकेमध्ये केलाय. तसंच या प्रकरणात अपराधी असल्याचं दाखवण्यात आलं असून पती राज कुंद्रांवर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिलं असल्याचं देखील चुकीचं वार्तांकन करण्यात आलं असल्याचं तिने म्हटलंय. माध्यमांनी चुकीचे, अपमानजनक, खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रकाशित केले आहेत आणि केवळ बदनामीच केली नाही तर आपली प्रतिमा देखील मलीन केल्याचा आरोप तिने या याचिकेत केला आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांनीही जुहू येथील राज आणि शिल्पाच्या घरी छापा टाकला आणि अभिनेत्रीचे निवेदन नोंदविले. बॉलिवूड स्टार्ससह शिल्पाचे चाहतेही या प्रकरणात दंग आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात अभिनेत्रीच्या अडचणीही वाढताना दिसतात. आधी गुन्हे शाखेच्या वक्तव्यावरून असे वाटत होते की शिल्पाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे, परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की या प्रकरणात संशयाची सुई देखील अभिनेत्रीच्या बाजूने आहे आणि आतापर्यंत तिला क्लीन चिट देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here