अखेर महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया राज्य समन्वयक व महासचिव प्रा. शिल्पा बोडखे यांनी काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा….

मुंबई – राज्यात भाजप आयटी सेलला प्रत्येक विषयांवर सडेतोड उत्तर देणारी तसेच महाविकास आघाडी सरकारची सोशल मीडियावर धुरा सांभाळणारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या राज्य समन्वयक व महासचिव शिल्पा बोडखे यांनी काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर आहेत अशी बातमी महाव्हाईस न्यूजने काल दिली होती ती आज खरी ठरली असून अखेर प्रा. शिल्पा बोडखे यांनी काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा दिला आहे.

प्रा. शिल्पा बोडखे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या महासचिव पदावर कार्यरत होत्या तसेच त्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया विभागाचे राज्य समन्वयक पद देखील जवाबदारी सांभाळत होत्या त्यांच्या परिने पुर्ण प्रयन्त करून काँग्रेस पक्षाची विचारधारा घरोघरी पोहचवण्यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले.

आणि महिला काँग्रेस कमिटी चे वेळोवेळी नव नविन अभियान राबवून संघटन मजबूत केले सोशल मिडीया च्या माध्यमातून वेबिनार घेवून महिलांना सोशल मिडीया प्रशिक्षण दिले त्याचे महत्व व त्याची ताकत कळवून दिली परंतू आता त्या एक महिला असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल नाही, आधी आबादी पुरा हक पंचायत से संसद तक महिलांना 33% आरक्षण ह्या निव्वळ कागदावर असून निवडणूकी पुरत्या मारलेल्या थापा आहेत हे सिद्ध झाले आहे.

असे त्यांना वाटू लागले त्यामुळे त्यांनी आता अश्या थापांना बळी पडायचे नाही म्हणत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या महासचिव व सोशल मिडीया विभाग राज्य समन्वयक पदाची जबाबदारी पार पाडता येणार नाही त्यामुळे स्वखुशीने कोणाच्याही दबावात न येता आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here