राज्यात काँग्रेसला धक्का…राज्य समन्वयक व महासचिव शिल्पा बोडखे काँग्रेस सोडण्याच्या मार्गवर…प्रोफाईल केले चेजं हटविले आपले पद…

मुंबई – राज्यात भाजप आयटी सेलला प्रत्येक विषयांवर सडेतोड उत्तर देणारी तसेच महाविकास आघाडी सरकारची सोशल मीडियावर धुरा सांभाळणारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या राज्य समन्वयक व महासचिव शिल्पा बोडखे काँग्रेस सोडण्याच्या मार्गवर, Tweeter वरून प्रोफाईल केले चेजं हटविले आपले पद…

शिल्पा बोडखे या गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात त्यात आता महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्य सरकारची सक्षम बाजू त्या सोशल वर मांडीत असतात.

शिल्पा बोडखे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या महासचिव पदावर कार्यरत होत्या तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया विभागाचे राज्य समन्वयक पद देखील इमानदारी सांभाळत होत्या काँग्रेस वाढविण्यासाठी पुर्ण प्रयन्त करून काँग्रेस पक्षाची विचारधारा घरोघरी पोहचवण्यासाठी अथक परिश्रम घेत होत्या आणि महिला काँग्रेस कमिटी चे वेळोवेळी नव नविन अभियान राबवून संघटन मजबूत करित होत्या.

सोशल मिडीया च्या माध्यमातून वेबिनार घेवून महिलांना सोशल मिडीया प्रशिक्षण देण्याचे काम त्याचे महत्व व त्याची ताकत महिलांना कळवून दिली राज्यात सरकार नसतांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत होत्या परंतू त्या मागील चार दिवसापासून सोशल मिडीया वर सक्रिय नव्हत्या व आज त्यांनी आपले फेसबूक ट्विटर प्रोफाईल वरिल काँग्रेस चे पद पोस्टर हटविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here