नवोदयचे प्राचार्य रवींद्र खंडारे यांना शिक्षारत्न पुरस्कार…

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार.

डेस्क न्युज – मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील रहिवासी असलेले व भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र रामभाऊ खंडारे यांना जागतिक स्तरावर कार्यरत असणारी भारतरत्न पब्लिशींग हाऊस संस्था दिल्लीतर्फे, शिक्षारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

या निमित्ताने त्यांचा जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मान केला.वेगवेगळया विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा संस्थेतर्फे गुणगौरव केला जातो. यावर्षी संस्थेने भारतातील वेगवेगळया क्षेत्रातील ९६ जणांची निवड केली आहे.

ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या संस्थेने डॉ.खंडारे यांना शिक्षारत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी त्यांचा सत्कार केला. महत्त्वाचे म्हणजे जळगावचे जिल्हाधिकारी मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावाचे आहेत.

डॉ. रवींद्र खंडारे यांना यापुर्वी २०१८ मध्ये नॉर्थ कोरिया, भूतान व काठमांडू युनिव्हर्सिटी ऑफ एशियाने डी. लीट पदवीने सन्मानीत केले आहे. जवाहर नवोदय विद्यालय रत्नागिरीला प्राचार्य असतांना त्या विद्यालयाला स्वच्छता अभियानामध्ये भारतातील ६६० नवोदय विद्यालयामध्ये प्रथम कमांक मिळाला होता.

प्राचार्य पदाच्या कारकिर्दीत त्यांना नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त व उपायुक्त यांनी २२ वेळा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. तर मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी त्यांच्या कार्याचा दोनवेळा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव केला आहे. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तरकर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here