कुंडलवाडी पोलीस ठाणे बनले वाळू माफियांसह अवैध धंदेवाल्यांचे कवचकुंडल; रात्रीच्या वेळी सर्रास वाहतूक…

file photo

बिलोली – रत्नाकर जाधव

कुंडलवाडी परिसरात वाळूमाफियांचे प्रस्थ वाढले असून स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या कवचकुंडल्या खाली सर्रास रात्रीच्या वेळी वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात आहे.कुंडलवाडी पोलिसांच्या सहकार्याने वाळूमाफिया मस्तावले असून नागरिकांमध्ये पोलीस व वाळूमफियांच्या लागेबंदमुळे दहशत पसरली आहे.आर्थिक हव्यासासाठी पोलीसच वाळूमाफियांचे कवचकुंडल बनले असल्याने महसूलचे अधिकरीही वाळूमाफिया विरुद्ध शिथिल झाले आहेत.

बिलोली तालुक्यातील मांजरा नदीतील लाल वाळू आंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे मांजरा नदी ही जिल्ह्याला सर्वात जास्त महसूल देणारी आहे.परंतु शासनाकडून गेली दोन वर्षां पासून मांजरा रेतीचा लिलाव झाला नाही.

त्यामुळे सध्या तालुक्यातील नागणी,कार्ला,गंजगाव माचनुर, बोळेगाव ,सगरोळी या भागात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.विशेषतः तालुक्यात सध्या नागणीसह नदी नदीपात्रातून कुंडलवाडी परिसरातील कोटग्याळ, ममदापूर,हरणाळी,

पिंपळगांव या भागातील वाळू माफिया कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांना पकडून त्यांच्याशी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडीने वाळू उत्खनन व वाहतूक करत आहेत.नागणी नदीपात्रातून रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करून “हायवा”,टिप्पर ने वाहतूक केली जात आहे.

प्रति ब्रास रु.९ हजार प्रमाणे वाळू घरकुल लाभार्थ्यांना टाकली जात आहे.विशेष म्हणजे वाळूची वाहतूक होत असतांना कुंडलवाडी पोलीस अधिकाऱ्यांच्या संमतीने एन्ट्री वसुली केळी जात असल्याच्या चर्चा आहेत.

पोलिसांच्या या प्रवृत्तीमुळे व महसुलाच्या पथकाला होणाऱ्या असहकार्यामुळे महसुलचे पथक ही वाळू माफियांच्या विरुद्ध निष्क्रिय झाले आहेत. कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत.वाळू उत्खननासह मटका जुगार या सारखे अवैध धंदे ही बोकाळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here