शेलुबाजार चौक गेला खड्ड्यात…बांधकाम विभाग कुंभकरणी झोपेत…

पवन राठी
शेलुबाजार

कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र आढळून आलेला असताना शेलुबाजार येथील कोरोना संक्रमित तीन रुग्ण आढळले होते व आरोग्य विभागाच्या सहकार्याने कोरोना या जीवघेण्या आजारावर मात करत ते तिन्ही रुग्ण आज बरे होऊन आपल्या घरी परत आलेले आहेत.

आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने कोरोना चा फैलाव शेलुबाजार परिसरामध्ये जास्त प्रमाणात होऊ दिला नाही. प्रत्येकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभागाने वेळोवेळी योग्य ते उपाय योजना राबवून नागरिकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले.

परंतु बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे आज शेलुबाजार मुख्य चौकाला डबक्या चे स्वरूप आलेले आहेत. औरंगाबाद नागपूर द्रुतगतीमार्ग, व मंगरूळपीर अकोला हा राष्ट्रीय महामार्गने या रस्त्याने हजारो वाहने दररोज ये-जा करतात ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे पायी चालणारे व इतर प्रवासी यांच्या अंगावर पाणी उडते,

व त्रास देखील सहन करावा. या साचलेल्या पाण्यामुळे समस्त नागरिकांना त्रास तर सहन करावा लागतो परंतु इतरत्र दुसऱ्या आजाराला या पाण्यामुळे चालना मिळू नये, तसेच खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यावर मच्छर बसून इतरत्र कोणता आजार होऊ नये म्हणून संबंधित व बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजमुद्रा ग्रुपने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here