स्वत:चाच नवऱ्यासोबतचा तरुणपणातील फोटो होता…तिला अफेयर असल्याचा संशय आला अन्…

फोटो -गुगल

न्यूज डेस्क – आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशयामुळे एका महिलेने आपल्या पतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या फोनवर त्याचा एका तरुणीसोबतचा फोटो पाहिल्यानंतर या महिलेने हल्ला केला. याहून चमत्कारिक गोष्ट म्हणजे ज्या फोटोमुळे महिलेने हा हल्ला केला तो फोटो तिचाच तरुणपणीचा फोटो असल्याचं नंतर तिला समजलं.

युकाटॅन मासिकामधील वृत्तानुसार लिओनोरा एन या महिलेला हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ज्या फोटोमुळे पत्नीने हल्ला केला तो फोटो आम्ही दोघं एकमेकांना डेट करत होतो तेव्हाचा होता, अशी माहिती लिओनोराचा पती जुआनने पोलिसांना दिली आहे. त्यावेळेस आम्ही दोघेही खूप तरुण आणि शरीरयष्टीने अगदी सडपातळ बांध्याचे असल्याने आतापेक्षा खूप वेगळे दिसायचो, असंही जुआनने पोलिसांनी सांगितलं आहे.

मॅक्सिकोमधील सोनोरा येथे हा सारा चक्रावून टाकणारा घटनाक्रम घडला आहे. पोलिसांनी लिओनोराला अटक केली तेव्हा तिच्या हातात चाकू होता असं काही प्रसारमाध्यमांमधील वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. याच चाकूने तिने आपल्या पतीवर हल्ला केला होता.

आपण वेळेत पत्नीच्या हातून चाकू खेचून घेतल्याने जीव वाचल्याचं जुआनने दिलेल्या जबाबामध्ये म्हटलं आहे. जुआनने आपल्या पत्नीसोबतचे काही जुने फोटो डिजिटलाइज करुन घेतले होते. त्यापैकीच एक फोटो त्याने मोबाईलवर ठेवला होता, असंही चौकशीदरम्यान समोर आलं आहे. घडलेला प्रकार ऐकून पोलीसही गोंधळात पडले.

हा विचित्र हल्ल्याची बातमी सोशल नेटवर्कींगवर व्हायरल झाल्यानंतर रेडइटसारख्या माध्यमावर यासंदर्भात अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अनेकांनी त्यांच्यासोबत घडलेल्या अशा विचित्र प्रकारांची माहिती या बातमीवर प्रतिक्रिया देताना दिलीय. एकाने असाच एक गृहस्थ मला भेटला होता

ज्याला त्याच्या पत्नीवर कायम संशय असायाचा असं म्हटलं आहे. तर अन्य एकाने माझ्या एका क्लायंटबरोबर असं घडल्याची माहिती दिली आहे. माझ्या क्लायंटच्या पत्नीला विरसभोळेपणाची समस्या होती. त्यामुळे तिला अनेकदा जुने फोटो पाहून गोंधळून गेल्यासारखं व्हायचं असं म्हटलं आहे. अशाच एका कमेंटमध्ये अन्य एका व्यक्तीने त्याची मैत्रिण एका आवडत्या मुलाला डेट करायला घाबरत असल्याचं सांगितलं. हा मुलगी आपल्या फसवणारं असं माझ्या मैत्रिणीला स्वप्न पडलं होतं म्हणून ती त्याच्यासमोर स्वत:च्या प्रेमाची कबुली द्यायला घाबर होती असं या व्यक्तीने सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here