डहाणू – जितेंद्र पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांनी, रविवार ता.11 रोजी डहाणूत येऊन, कोरोना काळात 8 ऑक्टोंबर रोजी दिवंगत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार यांचे समर्थक, राजेश हस्मुखलाल पारेख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
त्याच वेळी त्यानी डहाणू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी यांचेही निधन झाल्याने त्यांचा मुलगा नगरसेवक तन्मय बारी यांनाही आस्थेने जवळ बोलावून चौकशी करून धीर दिला.त्यानंतर ते डहाणू गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,

रमेश भाई कर्नावट आणि वाणगाव येथे जाऊन, राष्ट्रवादीचे जुने कार्यकते मुकुंदराव चव्हाण यांचेही निधन झाल्याने,त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनाही धीर दिला.यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुनिल भुसारा, मंत्री जितेंद्र आव्हाड,
माजी आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार कॉ,विनोद निकोले, लक्षदीप चे खासदार सादिक मोहम्मद, नगराध्यक्ष भरत राजपूत,माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, सत्यम ठाकूर, सुहास संखे,उपस्थित होते.

तसेच अनेक संघटनानी शरद पवार यांना विविध मागण्याची निवेदने दिली. वाढवणं बंदराचे काम पण त्वरित रद्द करावे अशी निवेदन वाढवण बंदर विरोधी कृती समिती तर्फे व स्थानिक ग्रामस्थांनी पवार यांना दिले. सकल मराठा क्रांती मोर्चा संघा तर्फे सुद्धा मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देण्यात आले.