शेतकरी संघटनेचे नेते योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी वैचारिक ऑनलाइन व्याख्यानमाला…

चाकण ( पुणे ) : युवा उद्योजक अभिमन्यू शेलार मित्र परिवार व चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी वैचारिक ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे युवा आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शेलार यांनी दिली.

शेतकरी संघटना आणि चाकण शिक्षण मंडळाचे संस्थापक शरद जोशी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गेल्या आठ वर्षापासून या वैचारिक व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येते.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमाला फेसबुकवर ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.

संध्याकाळी ७ वाजता फेसबुकवर shetkarisanghtnaMH या पेजवर तर झूमवर मिटिंग आयडी – 9231166377 यावर आपण ऑनलाइन सहभागी होऊन या व्याख्यान मालेचा आनंद घेऊ शकता. आज गुरूवारी ( दि. ३ सप्टेंबर ) स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष मानवेंद्र काचोळे यांचे ” कोरोनामुळे निर्माण झालेली संधी आणि आव्हाने ” या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले आहे.

शुक्रवार ( दि. ४ सप्टेंबर ) युवा लेखिका व विश्लेषक राही श्रुती गणेश ह्या ” आम्ही भारताचे लोक ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.शनिवारी ( दि. ५ सप्टेबर ) ज्येष्ठ विचारवंत समीक्षक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर हे ” बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले ” या विषयावर मार्गदर्शन करून अखेरचे पुष्प गुंफणार आहेत.

चाकण शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश अरगडे, विश्वस्त मोतीलाल सांकला, कार्यकारी विश्वस्त शांतीलाल मुत्था,प्रा.डॉ.राजेश लाटणे,प्रा.विकास देशमुख, पंकज गायकवाड व अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या पुढाकाराने संध्याकाळी ७ वाजता ऑनलाइनवर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here