शनि मंदिर रामटेक येथे शनि जयंती संपन्न…

रामटेक – राजू कापसे

श्री संकटमोचन शनि सेवा समिति रामटेक तरफे आज दि. १० जून २०२१ रोजी गुरुवार ला कोविड़चा प्रभाव बघता अत्यंत साधे पनाने शनि जयंती साजरी करण्यत आली. गेल्या 20 वर्षांपासून समिती द्वारे शनी जयंती चे आयोजन दरवर्षी दोन दिवसा मध्ये उत्सवाचा स्वरुपात करण्यात येते. मागच्या वर्षी तसेच यावर्षी सुध्दा कोविडच्या प्रभावाने अत्यंत साधेपणाने कोविडच्या नियमांचे सर्व पालन करून साजरी करण्यात आली.

सकाळी आठ वाजता शनी देवाच्या मूर्तीचे व शेळीच्या अभिषेक तसेच हनुमानजी च्या मूर्तीचे, गणेश मुर्तीचे तसेच शिव पिंडाचे अभिषेकाने सुरुवात झाली. त्यानंतर लगेच नऊ वाजता होम-हवन करून अगदी मोजक्या शनि भक्तां करिता महाप्रसाद वाटप करण्यात आले. शनि जयंती च्या आयोजनाकरिता समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , महासचिव , सहसचिव, कोषाध्यक्ष , यांच्यासोबत सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here