जिल्हाधीकाऱ्याच्या आशीर्वादाने “खनीकर्मात” सावळा गोंधळ..!

वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील गौनखनिज गैरप्रकाराच्या तक्रारी व चौकशी दरम्यान दोषींवर कारवाई करण्यात जिल्हाधिकारी असमर्थ ठरताना दिसत आहे. एव्हढेच नाही तर दोषी अधिकारी/कर्मचार्यांना पाठीशी घालुन भ्रष्टाचार्यांना खत पाणी घालन्याचे काम करीत असताना स्पष्ट पना निदर्शनास येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, नॅशनल युनियन ऑफ जर्नलीस्ट चे राज्य सचिव अमोल कोमावार यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२० पासून आजपर्यंत सर्व पुराव्यानिशी संबंधितांना तक्रारी व स्मरण पत्रें दिलीत त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना जायमोक्यावर गौनखनिजासह गैर प्रकार पकडून दिल्यानंतरही आजपर्यंत दोषींवर कुठलीच कारवाई केल्या गेली नाही.

या प्रकरणाबाबत कुठेच न्याय न मिळाल्यामुळे ह्या बाबतची तक्रार तक्रारदाराने रितसर लोकायुक्त आणि उपलोकायुक्त माहाराष्ट्र राज्य यांच्या न्यायालयात दाखल केली. परंतु त्या ठिकाणी ह्या प्रकरणा संदर्भात जिल्हाधिकारी यवतमाळ व तहसीलदार यवतमाळ यांच्या कडून खोटा /चुकीचा अहवाल सादर करुन चक्क न्यायालयाचीच दिशाभूल करण्याचा महान प्रताप करण्यात आला.

रेल्वे उत्खननातील गौनखनिज कारवाई प्रकरणांत चौकशी, कारवाई होत नसल्याने तक्रारदार ” आमरण उपोषण ” ला बसले व त्या ठिकाणी संबंधित खनिकर्म कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांसह येऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच लेखी स्वरूपात कारवाई चा अहवाल दिला व त्यात ” तथाकथित M I D C येथील फॅक्ट्री चार उल्लेख असुन दि. १/१/२०२१ रोजी तक्रारदाराच्या अनुपस्थित पंचनामा करून पुढील कारवाई साठी तहसीलदार यवतमाळ यांना पाठविले असे स्पष्ट नमुद आहे.

परंतु त्या तारखेपासून ५ महीन्या नंतर तहसीलदार यवतमाळ यांचे कडून माहिती अधिकारात माहिती असे लिहून दिले की असा कुठलाही पंचनामा आमच्याकडे खनिकर्म विभागाने दिलेला नाही. त्यानंतर त्या पंचनाम्याची प्रत तक्रारदाराने खनिकर्म विभागातून मिळवली तर त्यामध्ये तक्रारदार गैरहजर असल्यामुळे आम्हाला सहकार्य मिळाले नाही त्यामुळे हा पंचनामा केला व त्यात पाच लोकांची नावे व सह्या आहेत.

तसेच हा पंचनामा दि. १/१/२०२१ रोजी दुपारी १२:०० वा. केल्याचे नमुद आहे. परंतु लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांना दिलेल्या अहवालात “तक्रारदार यांच्या उपस्थितीत दि.१/१/२०२१ रोजी तथाकथित फॅक्ट्री चार पंचनामा केल्याचे” स्पष्ट व साफ खोटे, चुकीचे लीहुन पाठविले.एवढेच नाही तर जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी यांच्या स्वाक्षरी नीशी दुपारी २ वाजुन ४३ मीं.नी तक्रारदाराला ई-मेल करण्यात आला व त्या मध्ये स्पष्ट पणे नमुद आहे की ” आपण गैरहजर असल्यामुळे आज कुठलाही स्थळ निरीक्षन कींवा पंचनामा करु शकलो नाही.” असे स्पष्ट पने नमुद असताना ” तो” पंचनामा कुठला ? हा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याहीपेक्षा भयंकर प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा एम.आई.डी.सी.च्या संबंधित अधिकाऱ्यांकडून असे स्पष्ट झाले की,”ज्या तथाकथित फॅक्ट्री चा पंचनामा केला तर
त्या नावाची फॅक्ट्री च जिल्ह्यात अस्तित्वात नाही.” एव्हढा सावळा गोंधळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या समक्ष दि.२४/०९/२०२१ रोजी सुनावणी दरम्यान स्पष्ट होऊन सुद्धा संबंधित दोषींना पाठीशी घालण्याचे काम जिल्हाधिकारी यांचेकडून होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here