सात वर्षीय बलिकेलाआलेगावात डेंग्यूची लागण…

गावात घाणीचे सामराज्य ग्रामपंचायत चे दुर्लक्ष.

पातूर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत बेजबाबदार कारभारामुळे गावात घाणीचे सामराज्य पसरले आहे त्यामुळे गावातील एका सात वार्षीय बालीकेला डेंगू ची सुद्धा लागण झालेली असून तिच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा हा बेजबाबदार कारभार गावकऱ्यांसाठी आणखी किती डोकेदुखीचा ठरतो? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आलेगाव येथे ग्रामपंचायतच्या अत्यंत अनागोंदी व बेजबाबदार कारभारामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झालेल्या आहेत. गावात कोणत्याही प्रकारची साफसफाई व स्वच्छता केले जात नाही. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावल्या गेलेली नाही. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी गावात डासांचे साम्राज्य निर्माण होऊन एका सात वर्षीच्या मुलीला डेंग्यूची लागण झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभारामुळे गावात कोरोनाची सुद्धा लागण झाली होती.

ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांना गावातील नागरिकांच्या जीविताशी, गावातील साफसफाई, स्वच्छता व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याची काहीही घेणे देणे नाही. ग्रामपंचायत मधून रजिस्टर गायब होते, विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होतात, ग्रामपंचायतचे कारभारी बेजबाबदार आहेतच पण ग्रामसेवक सुद्धा नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दिसले नाहीत.

दिसले तरी ते नेमके काय करतात कुणालाच कळत नाही. त्यामुळे गावात सर्व काही आलबेल आहे. आलेगावातील या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आलेगाववासी नागरिक व्यक्त करीत आहेत.आलेगाव येथील सातवर्षीय मुलीवर उपचार सुरू असून प्राकृती समाधानकारक आहे.

नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसा मध्ये परिसर व घराच्या आजूबाजूला साचलेल्या पाण्यामुळे किटकजन्य आजार उद्भवण्याची दाट शक्यता असून त्यामुळे नागरिकांनी साचलेले पाणी तथा डबक्यातील पाणी काढून द्यावे. तसेच घरातील पाणी साठवण्याचे सर्व साधने स्वच्छ करावी व टायर,जुनी मातीचे भांडे पूर्णत: कोरडी करावी जेणेकरून डासांची अंडी तयार होणार नाहीत.

तसेच टाक्यांमध्ये,तलांवामध्ये गप्पी मासे टाकावी त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव टाळता येतो.परिसर दररोज स्वच्छ ठेवावा. लहान मुलांना ताप आल्यास तात्काळ उपचारासाठी डॉक्टरकडे जावे डॉ योगेश कराळे बाल रोग तज्ञ अकोला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here