खवल्या मांजर तस्करी प्रकरणातील सात ही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी…

बिलोली:
रत्नाकर जाधव
खवल्या मांजर तस्करी प्रकरणातील आंतरराज्य टोळीतील त्या सात ही आरोपींना येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्या.आर.आर.पत्की यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बिलोली शहरातील देशमुख नगर येथील एस.टी.महामंडळाच्या चालकाच्या घरातुन वनविभागाच्या पथकाने तस्करीसाठी आणलेल्या दोन खवल्या मांजरासह सात आरोपींना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते तर एक आरोपी फरार होता.

आज दि.२४ जूनला तस्करी प्रकरणातील सर्व सात आरोपींना बिलोली येथील प्रथम न्याय- दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्या.आर.आर.पत्की यांनी

सर्व आरोपींना २६ जून पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आसल्याची माहिती सरकारी वकील येमेकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here