दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करतांना सात आरोपीना पकडले…

◆दोन खवल्या मांजर पकडले.
◆वन विभागाची मोठी कारवाई

बिलोली:-पुढारी वृत्तसेवा

◆दुर्मिळ जातीच्या दोन खवल्या मांजराची तस्करी करतांना वन विभागाच्या पथकाने सहा आरोपींना रंगे हात पकडले आसून त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायदा १०७२ नुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती देगलूर विभागाचे आर.एफ.ओ. एल.जी. कोळी यांनी दिली.

◆जंगलातील दुर्मिळ प्राणी असलेल्या दोन खवल्या मांजराची परराज्यातून तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.यासाठी भोकर, बोधडी,हदगाव, येथील वनविभागाच्या आधिकरी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिलोली शहरातच या आंतरराज्य तस्कर टोळीच्या मुसक्या आवळल्या.यामध्ये आरोपी रवींद्र संतोष स्वामी,रतन भिवाजी हणवते,सुनील साहेबराव वायकोळे, फकीर माहेबूब शेख,तोहीतपाशा शेख इस्माईल, तकियोद्दीन खैरोद्दीन खतीब,मुजिगोद्दीन खैरोद्दीन खतीब या सात आरोपी विरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ५१ नुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देगलूर विभागाचे आर.एफ.ओ. कोळी जि.एल.यांनी दिली.

नांदेडचे उप वनरक्षक आशिष ठाकरे,साह्ययक वनरक्षक डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे आर.एफ.ओ. आशिष हिवरे,इस्लापुरचे आर.एफ.ओ. शिंदे, हदगावचे आर. एफ. ओ.रुद्रावार, बोधडीचे आर.एफ.ओ. जाधव यांच्या फळीने रात्र भर जागरण कारून फिल्म स्टाईल धाड टाकून पकडले.यावेळी भोकर, इस्लापुर, बोधडी, हदगाव व देगलूर विभागातील वनपाल, वनरक्षकांचा या पथकात समावेश होता.सदरली गुन्ह्याचा तपास देगलूर विभागाचे आर.एफ.ओ. जि.एल.कोळी यांच्याकडे दिला आहे दिला आहे.

◆सदरील तस्करी मधीली अती दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या खवल्या मांजर अनुसूचि न.१ मधला प्राणी म्हणून गणल्या जातो आणि आंतराष्ट्रीय काळया बाजार पेठेत एका मांजराची किंमत ७० ते ८० लाख असल्याचे समजते.खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे कनेक्शन बिलोलीत एक महामंडळाच्या चालका प्रयन्त असल्याने एकच खळबळ उडाली आहे.खवल्या मांजराच्या तस्करावर कारवाई करण्याची या विभागात पहिलीच वेळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here