कोगनोळी येथील अवैध वाहतुकीवर तोडगा…तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केली पहाणी…घ्यायला लावली दखल…

पंकज पाटील यांनी मानले पत्रकारांचे आभार…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील अवैध वाहतुकीचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत होता. ही वाहतूक थांबविण्यासाठी बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील,कोगनोळी ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने बेळगावचे जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांना दोन वेळा निवेदन सादर केले होते.जर यावर कार्यवाही नाही झाली तर महामार्ग रोखण्याचा इशारा देखील कोगनोळी करानी दिला होता.

आणि होणाऱ्या परिणामाला जिल्हा प्रशासनच जबाबदार असेल असे देखील सांगण्यात आले होते.तर याचाच एक भाग म्हणून दिनांक 1 फेब्रुवारी रोजी महामार्गावरील टोलला बगल देऊन कोगनोळी गावातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गावातील बस स्टॅन्ड वरती वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करण्यात आले होते.

व त्यावेळी देखील सांगण्यात आले होते की जर यावर तोडगा न काढल्यास सहा तारखेला पुणे-बंगलोर महामार्ग कोगनोळी. रोखण्यात येईल ..यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या व निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, निपाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक बि एस तळवार, पंकज पाटील आणि कोगनोळी येथील पत्रकार संघटना यांच्यामध्ये आज दिनांक 4 रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान बैठक संपन्न झाली,

व यावर तोडगा काढण्याकरिता कोगनोळी, हंचनाळ, सुळकुड या गावातील चार चाकी वाहन धारकांना पास देण्यात येतील आणि हा पास ज्यांच्याकडे असेल त्याच चार चाकी वाहन धारकाला गावात प्रवेश देण्यात येईल व ज्यांच्याकडे हा पास नसेल त्यांना प्रवेश न देता टोल भरून पुढे जावे लागणार अशा पद्धतीचा तोडगा या बैठकीत काढण्यात आला.यासाठी टोल मधील तीन शिप्टमध्ये सहा कर्मचारी,

ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस अधिकारी अशा प्रकारे या अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवण्याकरिता बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे..यावेळी पंकज पाटील म्हणाले सध्यातरी सहा तारखेला होणाऱ्या आंदोलनाला स्थगिती दिली असून येणाऱ्या आठ दिवसात कोगनोळी व लगतच्या गावांमध्ये असणाऱ्या वाहनधारकांना पास देण्यात येतील. त्याचबरोबर या अवैध वाहतुकीबद्दल कोगनोळी येथील ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल व विशेषता पत्रकारांनी देखील केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

यावेळी निपाणी महसूल निरीक्षक अजित वनजोळे, कोगनोळी ग्रामपंचायत पीडिओ डी बी जाधव, सेक्रेटरी पी डी चावर ,तलाठी पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर , ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, कोगनोळी पिके पी एस अध्यक्ष अनिल चौगुले, युवा पाटील, शहाजी नाईक ,कोगनोळी टोल मॅनेजर नानासाहेब गायकवाड, व्यवस्थापक उत्तम पाटील, सदाशिव लकडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here