रिपाई A चे जेष्ठ नेते दादारावजी वानखडे यांचे अल्पशा आजाराने निधन, निळी टोपी शेवटचा जय भीम…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

निळी टोपी म्हटलं की प्रथम नाव आठवते ते तेल्हारा तालुक्या सह अकोला जिल्याचे परिचित व्यक्तिमत्व रिपाईचे जेष्ठ नेते दादारावजी वानखडे वय 60 वर्ष रा गाडेगाव आज दिनांक 10 जुलै 2021 रोजी पहाटे राहत्या घरी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या मृत्यू पच्यात त्यांना पत्नी 1 मुलगा 1 मुलगी भाऊ असा मोठा आप्त परिवार असून त्यांच्यावर आज दुपारी 2 वाजता ( गाडेगाव ) येथे त्याचा मोठा मुलगा परमेश्वर वानखडे ह्यांच्या शेवटची मुखाग्नीने अंत्यसंस्कार होणार.

त्याच्या या निधनाने रिपाई आठवले गटाची मोठी हानी झाली असून रिपाई आठवले गटांच्या च्या स्थापने पासून ते सक्रिय राजकारनात होते गाव तालुका जिल्हा अशी अनेक पदे त्यांनी भोगली आहेत व जबाबदारी ने सांभाळली आहे व पक्ष संघटन मजबुत करून आपली ओळख निर्माण केली होती तसेच त्यांचे विविध पक्ष संघटनाच्या अध्यक्ष पदाधिकारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

त्यांच्या शब्दाला सुद्धा पक्षात मान होता त्यामुळे त्यांच्या या अचानक निधनाने गाव तालुका जिल्हातिल पोकळी नभरून निघणारी आहे त्यांच्या आत्म्यास रिपाई आठवले गटाचे अकोला जिल्याचे सर्व पदाधिकारी नेते यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अपूर्ण केली असून त्यांच्या कुटुंबा प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत त्यांच्या आत्म्यास शांती मिळो व त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून बाहेर निघण्याची भगवंत शक्ती प्रदान करो ही मनोकामना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here