नागपूर - शरद नागदेवे
इंदोरा बुध्द विहार इंदोरा नागपूर येथे ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेले ज्येष्ठ बौद्ध भिक्षू भदन्त नागघोष यांचे आज बुधवारी दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता दु:खद निधन झाले.
पु.भंदन्त नागघोष यांची अंतिम यात्रा दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता इंदोरा बुध्द विहार नागपूर येथून निघून कन्हान येथे जाईल.भंदन्त नागघोष,भंदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे निकटवर्तीय सहकारी होते.