मूर्तिजापुर नगरपरिषद जिल्हा अकोला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या वतीने शासन निर्देशानुसार पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत मै भी डिजिटल मोहिम अंतर्गत आर्थिक साक्षरता प्रशिक्षण आज दि.12/01/2021 रोजी मा. मुख्याधिकारी श्री विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शना नुसार आयोजित करण्यात आले होते.

शहरातील पथविक्रेत्याना या योजनेअंतर्गत रु दहा हजार प्रति लाभार्थी प्रमाणे कर्ज राष्ट्रीयकृत बँक मार्फत उपलब्ध करून देण्यात आले असून आपला व्यवसाय करत असताना आर्थिक व्यवहार करण्या करिता डिजिटल साधना पासून मिळणारे फायदे डिजिटल साधने कशी वापरावीत याचे प्रशिक्षण लाभर्थिना देण्यात आले.
यावेळी मा . नगराध्यक्षा सौ मोनालिताई गावंडे , सेंट्रल बँक ऑफ इंडिया मूर्तिजापुर चे एग्रीकल्चर ऑफिसर निशिकांत चव्हाण , सहा प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांचे हस्ते क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले.

यावेळी सेंट्रल बँक कडून 45 लाभार्थी यांना डिजिटल पेमेंट करण्या बाबत व क्यूआर कोड वापरण्याचे सविस्तर प्रशिक्षण यावेळी देण्यात आले , अश्या प्रकारचे प्रशिक्षण पुढील 24/1/2021 पर्यन्त या कालावधित विविध बँक मार्फत आयोजित करण्यात आल्याची माहिती राजेश भुगुल सहा. प्रकल्प अधिकारी यांनी या वेळी दिली.