बिलोलीतील ९ जणांचे स्वयाब प्रयोगशाळेत पाठवले ; यात ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ अहवाल प्राप्त होणे आहे…

बिलोली – रत्नाकर जाधव

◆शहरातील एका कृषिसेवा केंद्र चालकासह इतर आठ जनांचे स्वयाब परीक्षणासाठी नांदेडला पाठवण्यात आले होते त्या पैकी ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांच्या सव्याबची तपासणी चालू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लाखमावार यांनी दिली आहे.७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.

◆बिलोली शहरातील एका कृषिसेवा केंद्र चालकाची मुलगी व जावई कर्नाटकातून बिलोली येथे आले होते.ते परत कर्नाटक मध्ये गेल्यानंतर तेथे त्यांच्या सव्याबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कृषी केंद्र चालकाच्या कुटूंबातील व्यक्तींना होम क्वारंटाईल करण्यात आले होते.

त्यांच्या थ्रोट स्वयाब घेऊन नांदेड येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पाठवलेल्या ९ जणांपैकी ७ जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ जणांवर अहवाल तपासल्या जात असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लाखमावार यांनी सांगितले.९ जनांपैकी ७ जनांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे शहर व तालुक्यातील अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here