Friday, September 22, 2023
Homeराज्यस्व. देवकीबाई बंग हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम...

स्व. देवकीबाई बंग हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालात हिंगणा येथील स्थानिक स्व.देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालयाचा दहावीच्या शंभर टक्के निकाल लागला असून गुणवत्तेत मुलींनी मारली बाजी.

विद्यालयातील परीक्षेत एकूण 112 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 3 तीन विद्यार्थी गुणवत्ता प्रणाली मध्ये आले ,तर 51 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले कुमारी जानवी गिरडकर 91:40% घेऊन शाळेतून प्रथम आली तर कुमारी.तन्वी राठोड 90,:20 % घेऊन द्वितीय स्थान मिळवला. तिसऱ्या स्थानावर कुमारी.

मनाली साठवणे 90% गुणासह राहिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, संचालिका अरुणा बंग, संचालक महेश बंग, विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन तुपेकर व सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: