जीव मुठीत धरून पाहा कसे शेतकरी नदी ओलांडून जातात…आणि म्हणता डीजीटल इंडिया…

पिपळोद येथील नागरिकांना शेती करताना सहन करावा लागतो जीवघेणा त्रास…पावसाळ्यात नदी ओलांडून जावे लागते शेतात…अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे शासन लक्ष देईल का,नागरिकांनी उपस्थित केला प्रश्न

श्रीकृष्ण निचळ,दर्यापूर
पिपळोद(प्रतिनिधी)-दर्यापूर तालुक्यातील पिपळोद हे सात हजार लोकवस्ती असणारे व परशुराम महाराज मंदीर असल्याने तीर्थक्षेत्रम्हणून पंचक्रोशीतील गावामध्ये प्रसिद्ध आहे. पण येथील नागरिकाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न म्हणजे येथील नागरिकांना शेती करताना गावाला लागून असणारी नदी ओलांडवी लागते, या नदीतून आपला जीव मुठीत धरून शेतकरी आपली शेती करतात,पावसाळ्यात तर नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागतो आहे.

येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात नदी ओलांडून जावे लागत असल्याने नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,या नदीतून पावसाळ्यात प्रवास करताना त्रास होत असल्याने गावातील70 टक्के शेतकऱ्यांना शेतीत आर्थिक नुकसान सहन करावी लागते आहे. जर येथे काही जीवितहानी झाली तर जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे शासन लक्ष देईल का,नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here