SBI मध्ये सहा हजाराहून जास्त पदांसाठी अर्ज मागविले…असा असणार परीक्षेचा पॅटर्न

न्यूज डेस्क – स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अधिकृत वेबसाइटवर 6100 पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. भरती प्रक्रियेद्वारे राज्य / केंद्रशासित प्रदेशातील 33 वेगवेगळ्या पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in वेबसाइटवर 26 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे. या पदासाठी मासिक वेतन 15,000 रुपये आहे. ऑनलाईन अर्ज केल्यावर उमेदवाराला फी देखील भरावी लागेल. त्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. सर्वसाधारण ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांसाठी परीक्षा फी 300 रुपये आहे. तसेच एससी / एसटी आणि दिव्यांग उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येत नाही.

लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेमध्ये सामान्य आर्थिक ज्ञान, सामान्य इंग्रजी, क्वांटिटेटिव ॲप्टिट्युड (Quantitative Aptitude) आणि रिझनिंग एबिलिटी (Reasoning Ability) आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्युड (Computer Attitude) या चार विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. चारही विषयांसाठी प्रत्येकी 25-25 प्रश्न विचारले जातील.

आरक्षणाच्या नियमांनुसार एकूण 6,100 पदे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. ज्यामध्ये 2577 सर्वसाधारण, 604 ईडब्ल्यूएस, 1375 ओबीसी, 977 एससी आणि 567 जागा एसटीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

या परीक्षेसाठी असा अर्ज करू शकता. बँकेच्या वेबसाइटवर (Bank Website) जाऊन याबद्दलचं परिपत्रक (Notification) पूर्ण वाचा आणि त्यानुसार 26 जुलैपूर्वी अर्ज करा. या परीक्षेत आणि पुढच्या प्रक्रियेत यश मिळालं तर सरकारी नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. लागा तयारीला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here