चिखली:- वार्ड नं.9 माळीपुरा येथिल सावित्री बाई फुले नगर परीषद शाळा क्र.4 येथे व्यायाम शाळा होऊ नये यासाठी भारतिय मानवाधिकार संघटनच्या वतीने मुख्याधीकारी यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर असे की नगर परीषद चिखली च्या वतीने सावीत्रीबाई फुले न.प. शाळा क्र 4 येथे व्यायाम शाळा सुरु करण्याबाबत ठराव घेण्यात आल्याची माहिती मिळाली. जर ही व्यायामशाळा सुरु झाली तर या परीसरात महीला मुली असुरक्षीत होऊ शकतात कारण एका विशिष्ट जाती समुहाचे युवक एकत्र येऊन व्यायाम करणार गाणे वाजवणार या ठिकाणची शांतता भंग करणार दररोज वाद विवाद होण्याची शक्यता तसेच छोटया छोटया कारणावरुन मोठी जातीय दंगल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या परीसरात नविन तहसिल कार्यालय व कोषागार विभाग सह ईतर शासकीय कार्यालय आहेत. तसेच आमचे पाल्य हे शिक्षण घेत आहे त्यांचे अभ्यासातुन लक्ष विचलीत होऊन त्यांचे शैक्षणीक नुसकान होऊ शकते याच शाळे समोरुन शहरात जाणारा मुख्य रस्ता असल्याने महिला मुली मोठया प्रमाणात जाणे येणे करतात उदया त्यांच्या सोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या व ईतर कारणामुळे सावीत्रीबाई फुले नगर परीषद शाळा क्र. 4 येथे व्यायाम शाळा होऊ नये असे भारतीय मानवाधिकार संघटनचे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात मुख्याधीकारी नगर परीषद यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनावर भारतिय मानवाधिकार संघटनचे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे अरुण चिंचोले पाटिल विष्णु बळी ओंकार तीडके शेख ईद्रीस रविंद्र मोरवाल राजेंद्र मोरवाल किशोर खंडागळे राजुभाई म्हैसावाले तालीफ हाजी साहब शेख अनिस शेख सादिक गणेश श्रिवास ज्ञानेश्वर पाटील अर्जुन श्रीवास भागवत भराड कीशोर सुरुशे हरीश दंडेकर नितीन चव्हाण प्रल्हाद म्हस्के यांच्या सह परीसरातील शेकडो नागरीकांच्या सहया आहेत.